Cannes Film Festival 2023: सध्या कान्स चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. यावेळी कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) आलेल्या अनेक सेलिब्रेटींची चर्चा रंगताना दिसली होती. त्याचबरोबर त्यांच्या कपड्यांचीही प्रचंड प्रमाणात चर्चा झाली. ज्याप्रकारे कान्समध्ये यावेळी कोणते नवे चित्रपट पाहायला मिळणार आणि कोणते चित्रपट विजेते असतील यांची प्रचंड प्रमाणात चर्चा होत असली तरीसुद्धा सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या महागड्या कपड्यांची. त्यांच्या कपड्यांची अनेकदा प्रसंशाही होते त्याचसोबत अनेकांना ट्रोलिंगचाही (Trolling) सामना करावा लागतो.
कुणी चांगले कपडे परिधान केले होते इथपासून ते कोणाचे ड्रेस अत्यंत वाईट होते इथपर्यंत सगळ्यांचीच चर्चा होताना दिसते. सध्या अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela Cannes) मगरीच्या नेकलेसची जोरात चर्चा रंगली आहे. त्यातून यावेळी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.
आता कान्समध्ये कपड्यांना आणि फॅशनला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे परंतु 47 वर्षांपुर्वी कान्स चित्रपट महोत्सव कसा होता? तेव्हा कपड्यांनाही इतकंच महत्त्व होतं का, तेव्हा कपड्यांवरून वेगळ्या पद्धतीनं ट्रोलिंग केलं जायचे काय? असे प्रश्न तुम्हा आम्हाला पडल्यावाचून राहणार नाहीत. सध्या कान्स चित्रपट महोत्सव सुरू आहे यावेळी एका दिग्गज अभिनेत्रीचं एक ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. अभिनेत्री शबामा आझमीनं 1976 साली आलेल्या 'निशांत' या चित्रपटाच्या वेळेचा कान्स चित्रपट महोत्सवातील एक फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा - Amitabha Bachchan यांची पोस्ट चर्चेत; 70 लाख लोकांनी पाहिलेल्या 'या' व्हिडीओत असं आहे तरी काय?
या फोटोमध्ये अभिनेत्री स्मिता पाटील, शबामा आझमी आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल (Smita Patil) दिसत आहेत. हा फोटो ट्विटर 2017 साली त्यांनी शेअर केला होता ज्यात त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, कपडे तेव्हा म्हत्त्वाचे नव्हते तर चित्रपट महत्त्वाचे होते. सध्या कान्समध्ये कपड्यांना (Smita Patil at Cannes) जास्त महत्त्वं दिले जाते तेव्हा त्याला अनुसरून शबाना आझमी यांनी हे ट्विट व्हायरल केले होते. यावर नेटकऱ्यांनीही नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या होत्या. त्यातून आता पुन्हा एकदा शबामा आझामी यांचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
In Cannes1976 for Nishant in official section.The simplicity of it all. Film was important not the clothes! pic.twitter.com/hmHA2LHCN1
— Azmi Shabana (@AzmiShabana) April 15, 2017
कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी सारा अली खान, उर्वशी रौतेला, ऐश्वर्या राय बच्चन, मृणाल ठाकूर, ईशा गुप्ता अशा काही भारतीय सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या कपड्यांची आणि त्यांच्या हटके लुकचीही यावेळी प्रचंड प्रमाणात चर्चा झाली होती. उद्यापर्यंत हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.