प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा शाही साखरपुडा, पाहा होणार नवरा कोण आहे?

venkatesh daggubati : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे वेंकटेश दग्गूबाती यांच्या मुलीच्या साखरपुड्याची. यावेळी त्यांच्या साखरपुड्याला बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या जावयाबद्दल. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 26, 2023, 09:06 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा शाही साखरपुडा, पाहा होणार नवरा कोण आहे? title=
venkatesh daggubati second daughter engagement pics goes viral

venkatesh daggubati : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे व्यंकटेश दग्गुबाती यांच्या दुसऱ्या मुलीच्या साखरपुड्याची. सध्या तिच्या साखरपुड्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चर्चा आहे. सध्या तिच्या या साखरपुड्यांचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. वेंकटेश दग्गुबाती हे टॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. त्यांची मुलगी हयावाहिनी दग्गुबाती हिचा हैद्राबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्यांची मुलंही या इंडस्ट्रीत सक्रीय आहेत.

त्यांचा नातेवाईक राणा दग्गुबाती हा बाहूबलीमध्ये होता. घरच्या घरीच त्यांचा साखरपुडा हा दिमाखात पार पडला होता. वेंकटेश यांनी अनाडी या चित्रपटातूनही भुमिका निभावली आहे. वेंकटेश यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी आश्रिता हिचे लग्न झालेले आहे. यावेळी त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याला चिरंजीवी, महेश बाबू, राणा दग्गुबाती, नागा चैतन्य यांनी हजेरी लावली होती. 

सध्या त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, वेंकटेश यांचा होणार जावई हा डॉक्टर आहे. सध्या त्यांच्याबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही. त्या दोघांचे लग्न हे 2024 मध्ये संपन्न होईल. वेंकटेश दग्गुबाती हे सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून समोर आले होते. आता ते शैलेश कोलानु यांच्या 'सैंधव' यातून दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्यांचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याची. 

हेही वाचा : VIDEO: ''फक्त लड्डू देणार, मी नाही येणार'' मलायकाच्या इशाऱ्याने सलील कुलकर्णी लाजला

सध्या तिच्या साखरपुड्याचे फोटो हे सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.त्यामुळे त्यांची बरीच चर्चा ही रंगलेली आहे. सध्या बॉलिवूडमध्येही लग्नसोहळ्यांची चर्चा रंगलेली असते. यावेळी हयावाहिनी यांचा साखरपुडा हा दिमाखात पार पडला त्यामुळे त्ायंची जोरात चर्चा रंगलेली होती. सोबतच त्यांचे फोटोही सोशल मीडियावर हे व्हायरल झाले आहेत. यावेळी हयावाहिनी यांनी सुंदर पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती.