'वीरे दी वेडिंग २' लवकरच चाहत्यांच्या भेटीला

'वीरे दी वेडिंग २' चित्रपटाचं चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. 

Updated: Jan 12, 2020, 11:35 AM IST
'वीरे दी वेडिंग २' लवकरच चाहत्यांच्या भेटीला title=

मुंबई : मैत्रीच्या अतुट नात्यावर भाष्य करणार 'वीरे दी वेडिंग' २०१८ साली रूपेरी पडद्यावर दाखल झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून मैत्रीतील विश्वास, मस्ती, प्रेम इत्यादी गोष्टींनी चाहत्यांना भावूक केले होते. आपल्या मर्जीने आयुष्य जगणाऱ्या मैत्रिणींच्या जीवना भोवती या चित्रपटाची कथा आधारलेली होती. तर बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने दमदार यश मिळवले होते. 

अभिनेत्री करिना कपूर, सोनम कपूर, स्वारा भस्कर, शिका तलसानिया यांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले होते. आता पुन्हा 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाचा सिक्वल चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल बातमीला खुद्द अभिनेत्री करिना कपूर खानने दुजोरा दिला आहे. 

एका मुलाखतीत आपण 'वीरे दी वेडिंग २' चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी फार उत्सुक असल्याचे तिने सांगितले. 'वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या सिक्वलसाठी मी फार उत्सुक आहे. वीरे दी वेडिंगच्या चित्रिकरणावेळी खूप धम्माल मस्ती केली होती. आता पुन्हा ती मस्ती अनुभवण्याची इच्छा आहे.' अशाप्रकारे तिने 'वीरे दी वेडिंग २' चित्रपटाला दुजोरा दिला. 

'वीरे दी वेडिंग २' चित्रपटाचं चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक रिया कपूरच्या खांद्यावर आहे. 'वीरे दी वेडिंग २' चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर, स्वरा भास्कर यांचं कास्टिंग झाल्याचं सांगितलं जात होतं.

पण आता चित्रपटात करिनाची देखील एन्ट्री झाली आहे. तर आता  वीरे दी वेडिंग प्रमाणेच चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही सोनम, स्वरा, करिना आणि शिखा तलसानिया या चौघी दिसण्याची शक्यता आहे. 

प्रेग्नंसीच्या ब्रेकनंतर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून करिना कपूर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'गुडन्यूज' चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने दमदार कमाई केला.