पुन्हा पडद्यावर सलमान बनणार वरूण, आणखी एक रिमेक

बॉलिवूडचा ‘स्टुडंट’ वरूण धवन हा आपल्या वडीलांप्रमाणे इंडस्ट्रीत हिट ठरला आहे. एकेकाळी दिग्दर्शक डेविड धवनने लागोपाठ अनेक हिट सिनेमे दिले होते. आता तेच काम वरूण धवन करत आहे.

Updated: Dec 23, 2017, 08:01 PM IST
पुन्हा पडद्यावर सलमान बनणार वरूण, आणखी एक रिमेक title=

मुंबई : बॉलिवूडचा ‘स्टुडंट’ वरूण धवन हा आपल्या वडीलांप्रमाणे इंडस्ट्रीत हिट ठरला आहे. एकेकाळी दिग्दर्शक डेविड धवनने लागोपाठ अनेक हिट सिनेमे दिले होते. आता तेच काम वरूण धवन करत आहे. वरूणचे आतापर्यंत ९ सिनेमे रिलीज झाले आहेत त्यातील सर्वच सिनेमे हिट ठरले आहेत. 

वरूणसाठी २०१७ सुपरहिट

यावर्षी वरूणचे दोन सिनेमे रिलीज झालेत. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवां २’ हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेत. ‘जुडवां २’ मध्ये डेविड धवन आणि वरूण धवन या जोडीने धमाल केली आणि सलमान खानचा ९० च्या दशतकातील या सुपरहिट कॉमेडी सिनेमाला या दशकातही सुपरहिट केलं. पण आता असं वाटतंय की, दोघांना सलमानच्या सिनेमाची चटक लागली. 

सलमानचा आणखी एक सिनेमा रिमेक

मीडिया रिपोर्टनुसार, वरूण धवन आणि डेविड धवन सलमान आणि करिश्माच्या एका सुपरट सिनेमाचा रिमेक करण्याच्या तयारीत आहे. ‘बीवी नंबर १’ या सिनेमाबाबत दोघेही बरेच सिरीअस असल्याचे समजते. या सिनेमात सलमानचं लग्न करिश्मासोबत होतं आणि दिलफेक सलमानचं मन ऑफिसमधील एका मॉडलवर येतो. या मॉडलची भूमिका सुष्मिता सेनने साकारली होती. या सिनेमात अनिल कपूर आणि तब्बूचीही भूमिका आहे. 

कोण साकारणार भूमिका?

मीडिया रिपोर्टनुसार, ‘बीवी नंबर १’चा रिमेक बनवला जाणार आहे. ज्यात सलमानची भूमिका वरून धवन साकारेल. सिनेमाचं शूटिंग २०१८ च्या मध्यात सुरू होईल. पण सध्याच या सिनेमा करिश्मा आणि सुश्मिता सेनची भूमिका कोण साकारणात हे स्पष्ट झालेलं नाहीये.