Vaibhav Mangle on Garba: लोकप्रिय मराठी अभिनेता वैभव मांगले हे त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. वैभव यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. वैभव मांगले हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता त्यांनी गरब्यावर वक्तव्य केलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
वैभव मांगले यांनी विजयादशमीच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी गरबा आणि देवीच्या विसर्जनावर वक्तव्य केलं. या पोस्टमध्ये वैभव मांगले म्हणाले की 'आता दुर्गेच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री 11 पर्यंत गरबा खेळून नंतर वाजत गाजत विसर्जनाची प्रथा कुठून सुरू झाली?' अशा शब्दात वैभव मांगले यांनी संताप व्यक्त केला आहे.
वैभव मांगले यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला,'आता अगोदर सारखे सण,उत्सव हे भक्तिभावाने आणि श्रद्धेने होत नाही. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखविण्यासाठी आणि सर्व सामान्य लोका चंगळवादाच्या नावाखाली रील्स,व्हिडिओ आणि फॅशन म्हणून सण उत्सव साजरे करत आहेत. इथे परंपरा,चालीरीती यांच्याशी लोकांना काही एक लेणेघेणे उरले नाहीत. मुळात गरबा हा महाराष्ट्राचा प्रकारच नाही आहे. आपल्या इथे देवीचा जागर, घागरी फुंकणे असे कार्यक्रम होत असतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रीति आपण बदलत असतो स्वतःहून अणि धर्माचा आधार घेतो. काल तर चक्क, ' एक घुट मुझे भी पिला दे शराबी ' या ओळीवर नाच चालला होता. धार्मिक कार्यक्रम नाहीच, फक्त सामाजिक मनोरंजन.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'यांना देवाच्या नावाने इव्हेंट साजरे करायचे असतात बाकी मुहूर्त, देव भक्ती सब झूट...'. आणखी एक नेटकरी म्हणाला की 'तेच ना वात आलाय आता यांचा सण वार नकोसे वाटायला लागलेत. गरबा खेळायला पण. डोकं उठलं आमचं नुसतं गेले 10 दिवस. गल्लीतल्या गरब्यांना पण का उगाच डीजे आणि ढोल.'
हेही वाचा : 'बहिणीच्या लग्नात यायला वेळ नव्हता, आता कशी आली?' भारतात येताच ट्रोल झाली प्रियंका चोप्रा
वैभव मांगले यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांना अलब्त्या गलबत्या नाटकासाठी, ‘टाईमपास’ या चित्रपटाचे दोन्ही भाग, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमामुळे चर्चेत असतात.