मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते. उर्वशी तिच्या फॅशनमुळे चर्चेचा विषय ठरते. रेड कार्पेट लूक असो किंवा कोणतीही पार्टी उर्वशी तिच्या लूकमुळे चर्चेचा विषय ठरते. उर्वशी ही नेहमीच महागडे कपडे परिधान करते. नुकताच तिचा एक लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (Urvashi Rautela Fashion)
उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशीनं एका पार्टीत विदेशी ब्रँड 'Atelier Zuhra' या ब्रँडचा ड्रेस परिधान केला आहे. उर्वशीच्या मिनी ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. उर्वशीच्या ड्रेसवर लाल रंगाचे गुलाब आहेत. रिपोर्ट्सनुसार, उर्वशीनं परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत 60 लाख असल्याचे म्हटलं जात आहे. (urvashi rautela spends 60 lakhs of whooping amount for this short dress )
हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत जेव्हा मला प्रेमाचा आभास होतो, तेव्हाच मला वेदना होतात. उर्वशीच्या या फोटोला 4 लाख पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. उर्वशीच्या या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'उर्वशी तू फार सुंदर दिसत आहेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्वशी तुझ्यासारखाच तुझा ड्रेस सुंदर आहे', अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्वशीची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी 'ड्रेसची किंमत कळल्यानंतर तिला इतके पैसे कुठूण येतात असा सवाल केला आहे.'
रॅपर हनी सिंगच्या 'लव्ह डोस' या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केल्यानंतर उर्वशी रातोरात प्रकाश झोतात आली. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपासून ती क्रिकेटर ऋषभ पंतसोबतच्या कथित नात्यामुळे चर्चेत होती.