२८व्या दिवशीही 'उरी'ची रेकॉर्डब्रेक कमाई

 'उरी' २०१९ मधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट

Updated: Feb 8, 2019, 12:13 PM IST
२८व्या दिवशीही 'उरी'ची रेकॉर्डब्रेक कमाई title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री यामी गौतम स्टारर 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० करोड रूपयांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. ब्लॉकबस्टर 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक'ची प्रदर्शनानंतर चौथ्या आठवड्यातही कमाई चढत्या क्रमांकावर आहे. २०० करोडचा गल्ला पार करण्यासाठी चित्रपट केवळ २.१२ करोड दूर आहे. २०० करोड कमाईसह बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या नावे एक अनोखा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. 

आदित्य धर दिग्दर्शित 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' ११ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २८व्या दिवशीही चित्रपट चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट समिक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी 'उरी'च्या आकड्यांबाबत माहिती दिली. बुधवारी २७व्या दिवशी 'उरी'ने भारतीय बाजारात १९७.८८ करोड रूपयांचा गल्ला जमवला. 

 

यंदाच्या २०१९ मधील 'उरी' पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. भारतीय बाजारात चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एक महिन्याच्या आतच २०० करोड कमावणारा चित्रपट म्हणून 'उरी'च्या नावे रेकॉर्ड नोंदविण्यात येईल. सर्जिकल स्ट्राइकच्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात विक्की कौशलने चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. विक्की कौशलसह चित्रपटात यामी गौतम, परेश रावल, मोहित रैना या कलाकारांनीही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.