VIDEO : 'अपना टाईम आएगा' म्हणत 'गल्ली गर्ल'चा धम्माल डान्स

रणवीर सिंगच्या या गाण्यावर धनश्रीनं धरलेला ठेका अनेकांना पसंत पडलाय. आता तर तिच्याही स्टेप्स फॉलो होऊ लागल्यात

Updated: Feb 8, 2019, 11:36 AM IST
VIDEO : 'अपना टाईम आएगा' म्हणत 'गल्ली गर्ल'चा धम्माल डान्स title=

नवी दिल्ली : फरहान अख्तर, जोया अख्तर आणि रितेश सिधवानी यांची प्रोडक्शन कंपनी 'एक्सेल एन्टरटेन्मेंट' बॅनरखाली तयार झालेला 'गली बॉय' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंगनं महत्त्वाची भूमिका बजावलीय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर या सिनेमातलं 'अपना टाईम आएगा' हे गाणंही चांगलंच व्हायरल झालंय. 

या गाण्याची तरुणांमध्ये क्रेझ इतकी वाढलीय की ते या गाण्याच्या डान्स स्टेप्सही फॉलो करू लागलेत. नुकतंच, धनश्री वर्मा नावाच्या एका यूट्यूब चॅनलवर एका तरुणीचा याच गाण्यावरचा परफॉर्मन्स व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाच दिवसांत या व्हिडिओनं व्ह्यूजचा चार लाखांचा टप्पा पार केलाय. धनश्री ही मुंबईची एक डान्सर आहे.

रणवीर सिंगच्या या गाण्यावर धनश्रीनं धरलेला ठेका अनेकांना पसंत पडलाय. आता तर तिच्याही स्टेप्स फॉलो होऊ लागल्यात. सोशल मीडियाद्वारे धनश्रीला आपलं टॅलेन्ट लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी मिळालीय.