शाहरुखसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

अगर किसी चीज को.... 

Updated: Sep 11, 2019, 11:26 AM IST
शाहरुखसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?  title=

मुंबई : 'अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो...', असं म्हटलं की पुढचे शब्द आपोआपच आठवतात आणि म्हटलेही जातात. प्रेक्षकांपर्यंत हा संवाद पोहोचवणाऱ्या शाहरुखचा अंदाज आणि त्याचं रुप कोणालाही विसरता आलेलं नाही. अशा या किंग खानच्या एका चाहत्याने त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सहसा शाहरुखचे अनेक चाहते त्याच्यासोबतचा फोटो शेअर करतात. पण, सध्या ज्याने फोटो पोस्ट केला आहे, तो जास्तच खास आहे. कारण, कलाविश्वात तोसुद्धा आघाडीचा अभिनेता आहे. 

फोटो पाहून काही अंदाज लागत आहे का की हा अभिनेका नेमका आहे तरी कोण? 

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अशोका' या चित्रपटाच्या वेळचा किंग खानसोबतचा फोटो शेअर करणारा आणि स्वप्न खरी होतात असं ठामपणे सांगणारा हा अभिनेता आहे, विकी कौशल. विकीने शाहरुख आणि त्याच्या फोटोंचं एक कोलाज पोस्ट केलं होतं. ज्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी त्याची भेट घेतल्यावेळचा फोटो आणि काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानचे क्षण पाहायला मिळत आहेत. फोटोसोबतच त्याने स्वप्न खरी होतात.... असंही लिहिलं आहे. 

मुख्य म्हणजे विकीने अचानक शाहरुखसोबतचा फोटो शेअर केल्यामुळे अनेक चर्चांना उधाणही येत आहे. शाहरुख आणि विकी येत्या काळात कोणा एका चित्रपटातून एकत्र झळकणार असल्याच्या शक्यातांनाही वाव मिळू लागला आहे. कारण काहीही असो, हे फोटो कलाकारांना गतकाळात घेऊन गेले असणार हे मात्र खरं.