महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यात अडकली प्रियांका

प्रियांका तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय. 

Updated: Sep 11, 2019, 10:30 AM IST
महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यात अडकली प्रियांका title=

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होती. पण आता प्रियांका तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय. मंगळवारी 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनानंतर ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळतेय.  तरी दुसरीकडे मात्र ट्रेलरमुळे प्रियांकाची महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) कोपरखळी उडवण्यात आली आहे.

'द स्काय इज पिंक'च्या ट्रेलरमध्ये प्रियांकाने एक डायलॉग म्हटला आहे. त्यावर महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट करत, प्रियांकाला ७ वर्षांच्या शिक्षेची धमकीच दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटनंतर प्रियांकानेही ट्विट करत, मी रंगे हात पकडली गेली असल्याचं म्हटलंय.

ट्रेलरमध्ये प्रियांका, 'एक बार Aisha ठिक हो जाये ना, फिर साथ में बॅंक लुटेंगें' असा डायलॉग म्हणते. प्रियांकाचा हाच डायलॉग शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी, 'आयपीसी कलम ३९३ अंतर्गत ७ वर्षांची शिक्षा आणि दंड' होण्याची आठवण करुन देत असं ट्विट केलंय.

प्रियांकाने महाराष्ट्र पोलिसांचं हे ट्विट रिट्विट करत, 'मी रंगे हात पकडली गेली आहे. आता प्लान बी करावा लागेल' असं म्हटलंय.

चित्रपटात प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, जायरा वसीम, रोहित सराफ प्रमुख भूमिका साकारत आहे. शोनाली बोस दिग्दर्शित 'द स्काय इज पिंक' येत्या ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रियांकाच्या या कमबॅग चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच ट्विटर, यूट्यूबवर वर्ल्डवाइड ट्रेंडिंगमध्ये आहे.

'द स्काय इज पिंक' शिवाय क्रिस पॅट्सच्या 'Cowboy Ninja Viking' या चित्रपटात प्रियांका दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूडचे अनेक प्रोजेक्टस देखील आहेत.