अरे देवा!!! उर्फीने टॉप म्हणून गुंडाळलं प्लास्टिक..उर्फी जावेची अजब-गजब फॅशन

कधी फोटो कॉपीचा ड्रेस, तर कधी अंगावर चिटकवलेली फुलं यामुळे उर्फी प्रचंड चर्चेत आली होती. आता नव्या ड्रेसमुळे उर्फी जावेद पुन्हा चर्चेत

Updated: Apr 29, 2022, 03:54 PM IST
अरे देवा!!! उर्फीने टॉप म्हणून गुंडाळलं प्लास्टिक..उर्फी जावेची अजब-गजब फॅशन title=

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायमच ट्रोल होते मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून ती तिचा लूक कायम ठेवते. कधी फोटो कॉपीचा ड्रेस, तर कधी अंगावर चिटकवलेली फुलं यामुळे उर्फी प्रचंड चर्चेत आली होती. आता तिने पुन्हा असा ड्रेस घातलाय जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फी जावेद पुन्हा एकदा मुंबईत स्पॉट झाली, जिथे तिचा विचित्र लूक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. उर्फी जावेदने पांढऱ्या जीन्ससोबत अतिशय अनोखा टॉप घातला होता. यावेळी उर्फीने प्लास्टिकचे स्टाइल स्टेटमेंट केलेलं दिसलं.  उर्फी जावेदने घातलेला गुलाबी रंगाचा टॉप पाहून वितळलेलं प्लास्टिक असावं अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.

उर्फी जावेदने यापूर्वीही असेच विचित्र लूक करून लक्ष वेधून घेतलं होतं. अंगावर फुलं चिटकवून घेतलेल्या लूकची प्रचंड चर्चा झाली होती. सोशल मीडियावर नेहमी ट्रोल होऊनही उर्फीला मात्र त्याचा फार फरक पडत नाही.