शंभरदा तुलाच निवडेन... Cancer शी झुंज दिलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी भावूक पोस्ट

पतीकडे भेट म्हणून मागितलेली गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.   

Updated: Apr 29, 2022, 03:29 PM IST
शंभरदा तुलाच निवडेन... Cancer शी झुंज दिलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी भावूक पोस्ट  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जीवनात जोडीदाराचं फार महत्त्वं असतं. लहानाचे मोठे झाल्यानंतर जगण्याचा हा प्रवास पुढे जातो आणि एक नवं वळण येतं. या वळणावर आपल्याला अशा एका व्यक्तीची साथ मिळते, जी व्यक्ती आपलं सर्वस्व होऊन जाते. प्रत्येत चढ- उतारामध्ये या व्यक्तीच्या साथीनं जगण्याचा हा प्रवास सुकर आणि सुखकर वाटू लागतो. 

सहजीवनाचं हे नातं वाटतं तितकं सोपं नसतं, पण ते सोपं करण्याची कला अवगत असते त्यांच्या आयुष्यात दु:खाला थारा नसतो. एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीलाही अशाच व्यक्तीची साथ मिळाली. 

गंभीर आजारपणात या व्यक्तीनं अभिनेत्रीला मोठा आधार दिला. त्याची कायम ऋणी असणारी ही अभिनेत्री आहे, छवी मित्तल  (Chhavi Mittal) . काही दिवसांपूर्वीच छवीला कॅन्सरनं ग्रासल्याची माहिती समोर आली. 

ज्यानंतर बरेच उपचार आणि 6 तासांच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिला कॅन्सरमुक्त घोषित केलं. असह्य वेदनांचा सामना करणारी हीच छवी आज तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे.

पतीनं आपल्यापोटी घेतलेली मेहनत आणि दिलेली साथ या साऱ्यासाठी तिनं एक सुरेख- भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये छवीनं, शंभरदा मी तुलाच निवडेन असं म्हणत पतीवरील विश्वास व्यक्त केला आहे. 

लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या अभिनेत्रीनं पतीकडे आणखी 17 वर्षे साथ निभावण्याची मागणी करत पुढचं परिस्थितीनुसार ठरवू, अशी गोड खोडीही काढली आहे. 

छवीची ही पोस्ट आणि तिनं सोबत जोडलेले फोटो पाहताना, तिच्या आनंदाला कुणाची दृष्ट न लागो अशीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.