''हिला दगडांनी नाही तर .... मारलं पाहिजे'', उर्फी जावेदचा हा Video पाहिल्यानंतर कशी असेल तुमची प्रतिक्रिया...

यावेळी मात्र उर्फीनं चांगलाच कहर केला आहे. 

Updated: Aug 20, 2022, 10:10 PM IST
''हिला दगडांनी नाही तर .... मारलं पाहिजे'', उर्फी जावेदचा हा Video पाहिल्यानंतर कशी असेल तुमची प्रतिक्रिया... title=

Urfi Javed Video: उर्फी जावेद आपल्या विक्षिप्त फॅशनसाठी फेमस आहे. पण तिने कुठलेही फॅशन केली तरी मात्र ती ट्रोलर्सच्याच निशाण्यावर असते. आता पुन्हा एकदा आपली क्रिएटिव्हिटी उर्फीनं दाखवली असली तरी पुन्हा एकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी मात्र उर्फीनं चांगलाच कहर केला आहे. 

नुकताच उर्फीने आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिच्यावर कोणतरी दगडं फेकताना दिसत आहे आणि त्याच दगडांचा तयार केलेला ड्रेस तिने परिधान केला आहे. हा रिल बनवून तिने इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि या तिच्या हटक्या लुकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत परंतु अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं आहे. 

तिच्या फोटोंवर अनेकांनी अशी कमेंट आहे की हिला दगडांनी नाही तर विटांनी मारले पाहिजे. 

या व्हिडीओमध्ये तिने ब्रॅलेट आणि मिनी स्कर्ट घातला आहे जो पर्ल स्टोनचा बनलेला आहे. उर्फीने वर्तुळाकार एअरपीस केसांचा बन लुक केला आहे. 

उर्फीची प्रत्येक पोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. उर्फीच्या विचित्र फोटोशूट नेहमीच चर्चेत राहतात. कधी ती ज्यूटच्या गोण्यांतून कपडे बनवते, कधी काचेचे तर कधी फक्त फोटो लावून कपडे तयार करते आणि ते घालते. पण तिचा हा ड्रेस डिझायनर नक्की कोण आहे हे मात्र अद्याप कोणालाच कळलेले नाही. 

उर्फीने हा संदेश दिलाय? - उर्फीच्या या व्हिडिओतून तिला लोकांना एक संदेश द्यायचा आहे. उर्फीला सांगायचे आहे की लोक तिला काय म्हणतात याची पर्वा न करता ती प्रत्येक कमेंटला सकारात्मक पद्धतीने घेते. तिने हा व्हिडीओ शेअर करताना खाली कॅप्शन दिले आहे की हे काम करायला मला ट्रोलर्सनी उत्तेजित केले आहे तेव्हा मला दोष देऊ नका त्या ट्रोलर्सनाच द्या. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x