उर्फी जावेदला आता कॉपी करतेय 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री

उर्फी जावेदला कॉपी करणारी अभिनेत्री प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी  

Updated: Dec 19, 2021, 04:29 PM IST
उर्फी जावेदला आता कॉपी करतेय 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री title=

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 'बिग बॉस ओटीटी'नंतर उर्फी प्रकाशझोतात आली. . ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे हेडलाईन्समध्ये असते. अभिनेत्री कायम स्वतःचे असे फोटो शेअर करत असते, ज्यामुळे तिला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता बोल्ड कपडे घालणाऱ्या उर्वीला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने कॉपी केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अनन्या पांडे आहे. 

अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. आता देखील अनन्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोंमध्ये अनन्या पांडे पांढऱ्या मोनोकिनीत दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही चाहत्यांनी तिच्या लूकचे खूप कौतुक होत आहे. काहींनी मात्र अनन्याला ट्रोल केलं आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी आता उर्फी जावेदला कॉपी करते का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. 

अनन्या पांडेचा आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर अनन्या 'लीगर' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात ती साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. एवढंच नाही तर 'लीगर' सिनेमाच्या माध्यमातून अनन्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे.