Urfi ला पाहतच राहिल्या झिनत अमान... क्षणात बदलले त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव

Urfi Javed and Zeenat Aman : उर्फी जावेद आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी विविध कमेंट करत उर्फीला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. उर्फी आणि झीनत अमान यांचा हा व्हिडीओ दिल्लीतील एका कार्यक्रमातील आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 6, 2023, 03:52 PM IST
Urfi ला पाहतच राहिल्या झिनत अमान... क्षणात बदलले त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव title=
(Photo Credit : DietSabya Insatgram)

Urfi Javed and Zeenat Aman  : फॅशन म्हटलं की सगळ्यांना सेलिब्रिटी आठवतात पण त्याच ठिकाणी विचित्र फॅशन म्हटलं तर सगळ्यांना आठवते उर्फी जावेद. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या डिझायनर अमित अग्रवालच्या स्टोरच्या भव्य उद्घाटनातील आहे. या वेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री झीनत अमान यांचे देखील नाव आहे. उर्फीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्या देखील दिसत आहेत. झीनत अमान आणि उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्यावर विविध कमेंट करत आहेत. 

अमित अग्रवाल आणि झीनत अमान यांचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ DietSabya या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत झीनत अमान आणि उर्फी जावेद या बोलताना दिसत आहेत. दोघींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. झीनत यांनी काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर उर्फीनं काळ्या रंगाचा एक हटके कटपीस ड्रेस परिधान केला आहे. झीनत अमान उभ्या असून उर्फी त्यांना काही सांगताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'झीनत मॅम म्हणत असतील मला काय वाटतं ते तर आधी ऐकूण घे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'झीनत तिच्याकडे अशा प्रकारे पाहत आहेत जसे आपण सगळे जादुला पाहत होतो.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'झीनत या खालून वरून तिनं काय घातलं हे जाणून घेण्यासाठी बघत आहेत.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'उर्फी कोणाशी नाही तर झीनत अमान यांच्याकडून जज होत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी बोलते, मला तुम्हाला सांगायचे आहे की मला राम तेरी गंगा मैलीत असलेल्या कपड्यांनी मला प्रेरणा मिळाली आहे.' 

हेही वाचा : 'Samantha ही एक...', Ex Wife विषयी नागा चैतन्य हे काय बोलून गेला?

झीनत अमान यांनी फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्राम अकाऊंटवर डेब्यू केला आहे. त्यानंतर त्याच्याविषयी चर्चा सुरु झाल्या. झीनत या बऱ्याचवेळा त्यांच्या जुने फोटो शेअर करताना दिसतात. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रिटी कमेंट करताना दिसतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. उर्फी ही बऱ्याच वेळा तिच्या फॅशनविषयी बोलताना दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अशात तिच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.