आलीयाच्या आयुष्यात रणबीरपूर्वी 'या' तरुणांनी केलीय एन्ट्री, नावं ऐकून बसेल धक्का

रणबीर कपूरचे आलीयापूर्वी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. परंतु आलीयाबाबत फार कमी लोकांना माहित आहे.

Updated: Mar 17, 2022, 10:32 PM IST
आलीयाच्या आयुष्यात रणबीरपूर्वी 'या' तरुणांनी केलीय एन्ट्री, नावं ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : अभिनेत्री आलीया भट्टचा नुकताच गंगुबाई सिनेमा रिलिज झाला आहे. ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. आरआरआर या साउथ सिनेमामध्येही आलियाने महत्वाची भूमिका बजावली आहे. आलीया करिअरच्या एका वेगळ्याच उंचीवर येऊन पोहोचली आहे. नुकताच आलीयाने काल 29 वा वाढदिवस साजरा केला. तसेच पुढच्या काही महिन्यात आलीया लग्न करेल असे देखील बोलले जात आहे. अनेक काळापासून आलीया आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत आहेत. ज्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. हे जोडपं कधी लग्न करणार हे यांनी ऑफिशियली सांगितेलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहाते देखील, त्यांच्या लग्नाचा प्रतिक्षेत आहेत.

आपल्याला हे तर माहितच असेल की, आलीयाचा बॉयफ्रेंड म्हणजे रणबीर कपूरचे आलीयापूर्वी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. परंतु आलीयाबाबत फार कमी लोकांना माहित आहे.

आज आम्ही तुम्हाला अलीयाच्या अफेअर्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्यासोबत ती रणबीरला भेटण्यापूर्वी रिलेशनशिपमध्ये होती.

रमेश दुबे

रमेश दुबे हा अलीयाचा शालेय मित्र आहे. या दोघांची शाळेत चांगली मैत्री होती. ज्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

अली दादरकर

अलीसोबत आलीयाची मैत्री ही शाळेपासूनची आहे. तेथूनच या दोघांमध्ये प्रेम सुरू झाले. परंतु अलीला आलीयाने जास्त वेळ डेट केलं नाही आणि खूप कमी वेळात या दोघांचा ब्रेकअप झाला.

अली हा आलीयाचा पहिला बॉयफ्रेंड होता. तसेच त्याचा बॉलिवूडशी काहीही संबंध नव्हता. या दोघांना अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये स्पॉट केलं गेलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

आलीयानेनंतर सिद्धार्थमध्ये आपलं प्रेम शोधलं. ज्यानंतर या दोघांनी देखील एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. या दोघांची पहिली ओळख त्याच्या पहिला सिनेमा स्टुडंट ऑफद इअर या सिनेमादरम्यान झाली. परंतु सिद्धार्थ सोबत देखील अलीयाचं अफेअर फार काळ टिकलं नाही. या सिनेमाची शुटींग संपताच दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

वरुण धवन

सिद्धार्थ सोबतच आलीया वरुण धवनला देखील स्टुडंट ऑफद इअर या सिनेमाच्या शुटींग दरम्यान भेटली. असं बोललं जातं की सिद्धार्थला सोडल्यानंतर आलीयाने वरुनला डेट करायला सुरूवात केली होती. परंतु हे अफेअर देखील फार काळ टिकलं नाही.

काविन मित्तल

काविन हा हाईक मेसेंजरचा CEO आहे. काविन सोबत देखील आलीयाचं नाव जुळलं होतं. परंतु त्यानंतर रणबीर तिच्या आयुष्यात आल्यानंतर आलीयाने त्याला सोडलं.

रणबीर कपूर

सर्वात शेवटी आलीया रणबीर कपूरला भेटली. ज्याच्यासोबत अखेर लग्नबंधनात अडकण्याचा आलीयाने विचार केला आणि आता लवकरच हे दोघं लग्न करणार आहेत.