"9500 रुपये देतो फक्त..."; 'आदिपुरुष'च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर

Adipurush Reviews: मल्टी स्टारर चित्रपट असलेला 'आदिपुरुष' हा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला आहे. चित्रपटातील संवादांबरोबरच व्यक्तीरेखांवरुनही टीका होत असतानाच आता 'आदिपुरुष'ची टीम वेगळ्याच वादात सापडली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 18, 2023, 11:46 AM IST
"9500 रुपये देतो फक्त..."; 'आदिपुरुष'च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर title=
अनेकांनी आपल्याला असे मेसेज आल्याचा दावा केला आहे

Adipurush Nigative Reviews: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाले असले तरी त्यावरुन बराच वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. या चर्चेमध्ये नाकारात्मक चर्चेचा वाटा अधिक असल्याचं दिसत आहे. या चित्रपटाविरुद्ध थेट हायकोर्टातही याचिका करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. या चित्रपटामधील संवाद, व्यक्तीरेखा या साऱ्याच विषयांवरुन टीका होत असल्याचं दिसत आहे. 

निगेटीव्ह रिव्ह्यू काढण्यासाठी पैसे?

सोशल मीडियावरुन 'आदिपुरुष'वर टिकेची झोड उठत असतानाच नकारात्मक रिव्ह्यू पोस्ट करु नये यासाठी 'आदिपुरुष'च्या टीमकडून आर्थिक आमिष दाखवलं जात आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्विटर तसेच इन्स्ताग्रामवरील काही युझर्सने आपल्याला अशापद्धतीचे मेसेज आल्याचा दावा करत स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. नकारात्मक रिव्ह्यू डिलीट केले तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ अशी ऑफर या मेसेजमध्ये देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. 9500 रुपयांपासून ते 5500 रुपयांपर्यंतच्या ऑफर्स आपल्याला दिल्या जात असल्याचा दावा वेगवेगळ्या लोकांनी केला आहे. "एक तातडीची मागणी आहे. तुम्ही 'आदिपुरुष'संदर्भातील सर्व नकारात्मक ट्वीट्स डिलीट करुन काही सकारात्मक ट्वीट्स करु शकता का? मी तुम्हाला प्रत्येक ट्वीटसाठी 9500 रुपये देईन (जर तुम्ही त्वरित हे केलं तर)" असं एका मेसेजमध्ये म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'आदिपुरुष'चे सर्व शो बंद पडणार? हिंदू समाजाच्यावतीने थेट हायकोर्टात याचिका

व्हायरल झाले ट्वीट

अनेकांनी सोशल मीडियावर अशा ऑफर्स आल्याचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. लोकांनी यावरुन पीआर टीमला चांगलेच झापले आहे. आधी वाईट चित्रपट तयार करायचा आणि नंतर सारवासारव करुन झाल्यानंतर पैशांचं आमिष दाखवून खरे रिव्ह्यू डिलीट करायला सांगायचं हा काय प्रकार आहे? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. पाहूयात काही व्हायरल ट्वीट्स...

1) हिंदुत्वाचा अपमान

2) चुकीचा माणूस निवडला

3) मी नाही करणार डिलीट

नक्की वाचा >> "मी हात जोडून माफी मागतो, मात्र..."; Adipurush मधील 'टपोरी' संवादांवरुन मनोज मुंतशीरचं विधान

4) जास्त पैसे दिले तरी डिलीट नाही करणार

शिवसेनेकडूनही टीका

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदींनीही ट्वीटरवरुन चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका केली आहे. "'आदिपुरुष'चे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी तसेच दिग्दर्शकांनी संपूर्ण देशाची माफी मागावी. या चित्रपटासाठी रस्त्यावरील भाषेत लिहिलेलं संवाद फारच संतापजनक आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली जी भाषा वापरण्यात आलीय त्यामुळे संवेदनशील भारतीयांच्या भावना दुखवाल्या आहेत. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामावर चित्रपट बनवता आणि अल्पवधीत यश मिळवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडता, हे स्वीकारता करता येण्यासारखं नाही," असं चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.