मुंबई : सनी लिओनीने भलेही तिचं बॉलिवूड डेब्यू पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ मधून केलंय. पण तिचं करिअर एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २’ या सिनेमाने बनलं होतं.
या सिनेमातील ‘बेबी डॉल’ गाण्याने सनीला स्टार केलं होतं. एकप्रकारे पाहायला गेलं तर एकता कपूरनेच सनीला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. नंतर या दोघींमध्ये चांगली मैत्रीही झाली. मात्र आता या दोघींमध्ये आता खटके उडत आहेत.
मिड डे ने दिलेल्या एका वॄत्तानुसार, ‘बालाजीची हेड सनी लिओनीला त्यांच्या नव्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ या वेब सीरिजसोबत जोडायचं होतं. या वेब सीरिजच्या एका प्रमोशनल इव्हेंटला सनीला बोलवण्यात आलं होतं. पण सनीने त्यास नकार दिला. त्यामुळे तिचं बॉलिवूड करिअर उभं करणारी एकता कपूर चांगलीच भडकली आहे.’
एकताला वाटलं होतं की, सनीमुळे इव्हेंटमध्ये जरा ग्लॅमर येईल. पण सनीने नकार दिला. सनी नुकतीच लॉस एंजेलिसला गेली असून तिथे ती तिचं एक प्रॉडक्शन हाऊस सुरू करत आहे. त्यामुळे ती २ महिने बिझी असणार आहे. तशी सनीने एकताला नकार देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अनेकदा तिने एकताला इव्हेंट्ससाठी नकार दिला आहे.