तुझ्याच जीव रंगला : राणाला कोंडून ठेवणं पाठकबाईंना पडणार का महागात?

मुंबई : तुझ्यात जीव रंगला या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ७ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात राणाच्या घरापासून झाली. भुकेने व्याकुळ झालेल्या राणाला अंजली खोलीत कोंडून निघून जाते. राणा मात्र सारखा अंजलीच्या नावाने ओरडून ओरडून व्याकूळ होतो. दरम्यान नंदीता दरवाजावर येऊन राणाची माफी मागत असते कारण, तिच्यामुळे राणाला डाएटच्या फंड्यात पडावे लागले होते. दुसरीकडे औद्या आपली सेटिंग लागावी म्हणून सुरजला घेऊन सखीच्या घरी जातो. सखी दार उघडताच औद्या सखीचे सौंदर्य पाहून तिच्या स्वप्नात हरवून जातो. तेवढ्यात सखी विचारते काय झाले? तेव्हा सुरज म्हणतो राणाचे डाएट बंद करा प्लिज. त्याला नाही जमणार हो हे डाएट फाएट.

एवढ्यात नंदीता सुरजला फोन करून सांगते लवकर या, राणाला कोंडून ठेवले आहे. हे ऐकताच राणाचा सखीकडून तडक घरी जाण्यासाठी निघतो व सोबत सखीलाही घेऊन जातो.तिकडे राणा बंद खोलीत सारखी देवाला प्रार्थना करून स्वतःच स्वतःला प्रश्न विचारत असतो त्याच्यावर अशी वेळ येण्याचे कारण. भुकेने व्याकुळ झालेल्या राणाला सारखे खाद्यपदार्थ दिसत असतात. शेवटी शेवटी राणाला एवढी भूक अनावर होते की त्याच्या रागाचा पारा चढू लागतो. म्हणून राग आवरण्यासाठी राणा भिंतीवर हातांचे मुक्के मारून आपल्या भुकेचा राग भिंतीवर काढू लागतो. काही वेळाने सखी राणाच्या घरी येते आणि अंजलीला म्हणते त्याला असे कोंडून डाएट सफल होणार नाही. म्हणून अंजली आणि सखी राणाला कोंडलेल्या खोलीतून मुक्त करण्यासाठी राणाच्या खोलीच्या दिशेने जातात.

दरम्यान भडकलेला राणा आता सखी आणि अंजलीची चांगलीच कोंडी करेल या विचाराने नंदीता मनातल्या मनात जाम खुश होते. नंदीताच्या मनासारखे घडेल का आणि राणाच्या खोलीचा दरवाजा उघडल्यावर राणा अंजली आणि सखीला आपल्या रागाचे रौद्ररूप दाखवेल का हे बघण्यासाठी तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा उद्याचा रंगतदार एपिसोड बघायला विसरू नका.