Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. तिच्या मृत्युसाठी जबाबादार असल्याचे म्हटले जाणाऱ्या बॉयफ्रेंड आणि सहकलाकाराला अटक करण्यात आली आहे. 

Updated: Dec 26, 2022, 10:37 AM IST
Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका? title=

Tunisha Sharma Death Case : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शनिवारी 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. मेकअप रुममध्येच तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येने आता एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तुनिषाचा प्रियकर शिझान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोप तिच्या आईनं केले होते. शिझान खानला 4 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे आणि त्यामुळे शिझान खान हा निर्दोष सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

रविवारी पहाटे तुनिषाचे शवविच्छेदन करण्यात आले. पाच डॉक्टर्सच्या पॅनेलकडून तुनिषाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या मृत्यूचे खरं कारण आले आहे. डॉक्टरांनी महत्त्वाचा खुलासा केला असून फास लागल्यानेच तुनिषाचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदानतून समोर आलय. यावेळी तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात गर्भधारणेशी संबंधित कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तुनिषा आणि शिझान विषयी आणखी एक माहिती समोर आली आहे की 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे ती अस्वस्थ आणि डिप्रेशनमध्ये होते. त्यामुळे तिनं इतकं मोठं पाऊल उचललं असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिझाननं तुनिषाला काहीही त्रास दिला नाही, तर याशिवाय त्यानं तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं नाही. ही आत्महत्याच आहेच, असं पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे शिझान खान हा निर्दोष सुटणार का? या प्रकरणात त्याला कोणतीही शिक्षा होणार नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तुनिषा सतत जायची शिझानच्या घरी

"लडाखला गेल्यावर त्यांची जवळीक वाढली होती. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि त्यामुळे तासनतास बोलायचे. तुनिषा दिवसाआड शिझानच्या घरी जायची. शिझानच्या कुटुंबातील सदस्य, आई आणि बहीण तिच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी नेहमी बनवायचेय. 15 दिवसांपूर्वी तुनिषाला शिझानच्या आयुष्यात आणखी कोणीतरी असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर तुनिषा तुटली. 16 डिसेंबर रोजी सेटवर शूटिंग करत असताना तुनिषाची तब्येत बिघडली. त्यानंतर सेटवरील लोकांनी तिला बोरिवली येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आम्हाला याची माहिती देण्यात आहे. जेव्हा आम्ही तिथे पोहोचले तेव्हा 'त्याने माझी फसवणूक केली, तो माझ्यासोबत असं कसं करू शकतो, त्यानं माझ्यावर अन्याय केला,' असे म्हणत होती," असे तुनिषानं तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

हेही वाचा : पोरी असाव्यात तर अशा! Kajol आणि तिच्या बहीणीनं मिळुन आईला अशी भेट दिली की...

दरम्यान, Tunisha Sharma नं आतापर्यंत 'भारत के वीर पुत्र - महाराणा प्रताप' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'गब्बर पुंचवाला', 'शेर एक पंजाब - महाराजा रणजीत सिंग', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभान अल्लाह' आणि 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. इतकंच नव्हे तर Tunisha Sharma नं बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या 'फितूर' चित्रपटात काम केलं आहे.