'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 23, 2017, 05:46 PM IST
'तुला कळणार नाही' सिनेमाचा ट्रेलर लाँच  title=

मुंबई : सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांचा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. 

'तुला कळणार नाही' या सिनेमात आपल्याला एक गोड कपल पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे सुबोध आणि सोनालीचं. नातं  कितीही लग्नाचं असलं तरीही त्यामध्ये रोज तोच तोच पणा येतो. अशा वेळी आपण जसं मोबाईल Hang झाल्यावर तो Restart करतो अगदी तसंच नात्याचं देखील आहे. कधी तरी या नात्याला Restart करण्याची नितांत गरज असते. 

कधी कधी अशा नात्यात आपण एकत्र असून खूप वेगळे असतो. तर कधी वेगळे असून एकत्र दिसतात. पती पत्नीचं हे नातंच असं असतं. आणि हेच या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात, गणेश आगमनाच्या पूर्वतयारीचा मोठा देखावा उभारण्यात आला होता. अस्सल पारंपारिक पेहराव परिधान करत या सिनेमाच्या सर्व स्टारकास्टनी उपस्थिती लावली होती.

सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरचे सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठीतील आदर्श दाम्पत्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ आणि एकमेकांवरचे अबोल प्रेम दाखवणारा हा ट्रेलर घराघरातील प्रत्येक नवराबायकोला आपलासा करणारा आहे. वैवाहिक नात्यात बांधलो गेले असल्यामुळे, सोडता येत नाही आणि पकडतादेखील येत नाही अशी गत आपल्यापैकी अनेकांची झाली असते. त्यावेळी ते कोणता मार्ग निवडतात? जोडीदारांचे वाढते अहंकार आणि त्यासोबतच वाढत जाणा-या अव्यक्त प्रेमाची जाणीव, या द्वंदात अडकलेल्या जगातल्या प्रत्येक नवराबायकोची सुंदर कथा या ट्रेलरमध्ये दिसून येते.