मुंबई : बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) मुलगी त्रिशाला दत्त ही जरी चित्रपटांच्या झगमगाटापासून दूर असली तरीही ती आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. त्रिशाला दत्त ही तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरीच सक्रिय असते आणि आपली बोल्ड फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. पण यावेळी त्रिशलानं बोल्ड फोटो नाही तर तिची आई आणि वडील दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
त्रिशलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्रिशलाची आई रिचा शर्मा आणि वडील संजय दत्त दिसत आहे. हा फोटो शेअर करत स्वर्गवासी माझी आई रिचा शर्मा आणि वडील संजय दत्त असं कॅप्शनही त्रिशलानं दिलं आहे. त्रिशलानं हा फोटो इन्स्टाग्रामवर सुरु असलेल्या One photo you love, but it’s not you या ट्रेंडनुसार शेअर केला आहे. दरम्यान, आता त्रिशला कोण होती असा प्रश्न अनेकांना पडला असेल की रिचा शर्मा कोण होती ? आणि तिचा आणि संजय दत्तचा घटस्फोट का झाला?
रिचानं तिचं शिक्षण अमेरिकेत केलं. शाळेत असतानाच अभिनयात रस असल्याचे रिचाच्या लक्षात आले आणि तिनं बहुतेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारली. रिचाला अभिनय क्षेत्रात तिचं करिअर करायचे होते म्हणून ती अमेरिकेतून मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर रिचा थेट देवानंदसाहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. त्यावेळी रिचा ही फक्त 14 वर्षांची होती. थोड्यादिवसात कॉल करून देवानंद यांनी तिला कॉल केला आणि तुला चित्रपटात काम करायला आवडेल का असा प्रश्न विचारला? मग रिचाला तिचा पहिला चित्रपट 'हम नौजवान' मिळाला. 'हम नौजवान' हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला. यानंतर रिचाची तुलना ही झीनत अमान आणि टीना मुनीम यांच्याशी करण्यात आली.
1987 मध्ये रिचा आणि संजय दत्तची पहिली भेट झाली. तेथून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली आणि एक दिवस संजय दत्तनं रिचाला लग्नासाठी विचारणा केली. पण यासोबत संजयनं अट ठेवली की लग्नानंतर तिला अभिनय क्षेत्र सोडावं लागेल. रिचानं ही अट मान्य केली आणि त्यांच लग्न झालं. लग्नाच्या चार महिन्यानंतर एक दिवस अचानक रिचाची तब्येत बिघडली आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर तिला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले. (Trishala Dutt Shares Photo Of Sanjay Dutt And Mom Richa Sharma Who Is She)
संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या अफेअरच्या चर्चांनी रिचाला प्रचंड त्रास झाला. त्यानंतर संजयला भेटण्यासाठी रिचा अमेरिकेहून मुंबईत आली. रिचानं विमानतळावर संजयची प्रतिक्षा केली मात्र संजय तिला भेटयाला आला नाही. हे पाहता रिचा त्रिशला आणि तिच्या आईला घेऊन अमेरिकेला परतली. त्यानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, असे रिचाच्या बहिणीनं सांगितलं. अचानक रिचाची तब्येत बिघडली आणि 10 डिसेंबर 1996 रोजी ऋचाने अखेरचा श्वास घेतला. मात्र, रिचाच्या निधनानंतर संजय त्रिशलाची जास्त काळजी घ्यायला लागला आणि त्यानं त्रिशलाला आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले.