Sonalee Kulkarniचा सप्तपदीचा लूक पाहून चाहते घायाळ...पाहा खास फोटो

सोनाली कुलकर्णीने सप्तपदीचा साडीमधील तिचा लूकचा फोटो शेअर केला आहे.

Updated: Aug 29, 2022, 07:40 PM IST
Sonalee Kulkarniचा सप्तपदीचा लूक पाहून चाहते घायाळ...पाहा खास फोटो  title=
trending news sonalee kulkarni wedding paithani look photo viral on social media

Sonalee Kulkarni: सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारणही तसंच आहे कारण सोनाली कुलकर्णी तिच्या लग्नातील अविस्मरणीय क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तुम्ही तिच्या मेहेंदी आणि हळदीचे अगदी लग्नाच्या दिवशीचे फोटो पाहिले आहेत. (ews sonalee kulkarni wedding paithani look photo viral on social media)

तर आज सोनाली कुलकर्णीने सप्तपदीचा साडीमधील तिचा लूकचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ती लिहिलं आहे की, सप्तपदींची पैठणी...मामाकडची साडी #सोनालीपैठणी कडून...या पोस्टमधून नववधूच्या भावना दिसून येत आहे. 

हिरव्या रंगाच्या या पैठणीत सोनालीचं रुप खूप खुलून दिसतं आहे. पारंपारिक मराठी नवरीचा तिचा हा पैठणीतील लूक सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला सोनालीच्या लग्नाचे अविस्मरणीय क्षण पाहिल्याचं असेल तर तुम्ही प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते पाहू शकणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून एकाच लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे ती म्हणजे सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची.