'Taarak Mehta...'चंपकलाल यांची पत्नी म्हणजे 'अप्सरा'; त्यांच्या सौंदर्यापुढे बबिता जी देखील फेल

मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Updated: Jun 18, 2021, 08:27 AM IST
'Taarak Mehta...'चंपकलाल यांची पत्नी म्हणजे 'अप्सरा'; त्यांच्या सौंदर्यापुढे बबिता जी देखील फेल  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गोकूळधाम सोसयटीमधील एकतेमुळे ही मालिका मोठ्यांना आवडते तर टप्पूसेनेमुळे बच्चे कंपनीला. मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. मालिकेतील अनेक चर्चा चाहत्यांमध्ये पसरत असतात. कधी चर्चा रंगते जेठालाल यांच्या मानधनाबद्दल तर कधी बबीताजी यांचं सौंदर्याबद्दल.  पण आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे चंपकलाल यांच्याबद्दल. चंपकचाचा म्हणजे अमित भट्ट (Amit Bhatt).  

Amit Bhatt wife kruti bhatt

चंपकचाचा स्वतःमुळे नाही तर त्यांच्या पत्नीमुळे चर्चेत आले आहेत. सध्या अमित भट्ट यांच्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत. आज तुम्ही अमित भट्ट यांच्या पत्नीला भेटा. चंपचलाल गडा म्हणजेचं अमित भट्ट त्यांच्या खऱ्या आयुष्यात प्रचंड रोमांटीक आहेत. 

Amit Bhatt kruti bhatt

अमित भट्ट यांच्या पत्नीचं नाव क्रुती भट्ट (Kruti Bhatt) असं आहे. क्रुती भट्ट यांचं सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवेल असं आहे. 

Amit Bhatt kruti bhatt travel together

अमित भट्ट यांच्या चाहत्यांच्या मते बबिता यांच्यापेक्षा क्रुती भट्ट अधिक सुंदर आहे. अमित भट्ट आणि क्रुती भट्ट यांना दोन मुलं आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमित कायम त्यांच्या व्यक्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करतात.