मुंबई : बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचं (Akshay Kumar) देशप्रेम प्रत्येकाला ठाऊक आहे. वेळोवेळी तो देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त करत असतो. शिवाय अक्षय सैन्य दलातील जवानांचा तो आदर आणि सन्मान देखील करतो. अक्षय कुमार काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात पोहोचला. यावेळी अक्षयने जवानांसोबत संवाद साधत त्यांच्यासोबत ठेका देखील धरला. त्याने यादरम्यानच्या सर्व आठवणी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
अक्षय कुमारने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'बीएसएफ सोबत एक अविस्मरणीय दिवस घालवला. येथे येणे नेहमीच एक आनंददायक अनुभव असतो. खऱ्या हिरोंना भेटल्यावर माझ्या हृदयात फक्त एक आदर असतो,' असं अक्षय म्हणाला आहे. एवढंच नाही तर अक्षयने जवानांसोबत पंजा देखील लढवला. जवानांसोबत अक्षयचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारने तुळैलच्या नीरू गावात शालेय इमारतीच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. शिवाय त्याने तैनात जवान आणि बीएसएफ जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी भागाचा दैरा देखील केला. त्यामुळे सोशल मीडियावर अक्षयचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
Great synergy beheld between @akshaykumar and #Bordermen of @BSF_Kashmir at #LOC .@PMOIndia @HMOIndia @BSF_India @ddnewsSrinagar pic.twitter.com/xRuWMidyYw
— BSF Kashmir (@BSF_Kashmir) June 17, 2021
अक्षयने त्याच्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये एका कर्तव्यदक्ष जवानाच्या भूमिकेला न्याय दिला. अक्षयच्या ‘सैनिक’, ‘बेबी’, ‘हॉलिडे’, यांसरख्या चित्रपटांच्या माध्यमातून देशभक्तीची झलक पाहायला मिळाली. आता लवकरच अक्षय ‘बेल बॉटम’ आणि ‘सुर्यवंशी’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.