टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचा जुना फोटो व्हायरल

टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचा जुना फोटो व्हायरल

शैलेश मुसळे | Updated: May 6, 2018, 11:00 AM IST
टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचा जुना फोटो व्हायरल title=

मुंबई : आपल्या डान्समुळे बॉलीवूडमध्ये जाणला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल होतो आहे. ही तरुणी टायगरची गर्लफ्रेंड आहे. पण आता तिने देखील अभिनेत्री म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फोटोमध्ये पाहून सुरवातीला तिला ओळखणे कठीण झाले असेल. फोटोमध्ये दिसणारी ही तरुणी आहे अभिनेत्री दिशा पटानी. आज दिशाचे लाखो फॅन्स आहेत. बागी 2 सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ती दिसली होती.

 

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पटानीचा जन्म 13 जून 1992 ला झाला होता. हिंदी नाहीतर तेलगू सिनेमांमध्ये देखील तिने काम केलं आहे. दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवे नवे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशा पटानीने बॉलीवुडमध्ये एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात काम केलं होतं. जॅकी चॅन सोबत देखील तिने अभिनय करत अनेकांचं मन जिंकलं आहे. दिशा पटानी सध्या बागी 2 सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. टायगर श्राफ देखील या सिनेमात काम करतोय. बागी 2 चा ट्रेलर लाँच होताच एका दिवसात करोडो लोकांनी तो पहिला आहे.

 

@arpita__mehta

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on