सलमानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, आठव्या दिवशीच Tiger 3 ला उतरती कळा

सध्या 'टायगर 3'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने सगळ्यांनाचा हैराण केलं होतं. 'टाइगर 3' ने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग केली होती.

Updated: Nov 21, 2023, 06:44 PM IST
सलमानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, आठव्या दिवशीच Tiger 3 ला उतरती कळा title=

Tiger 3 Box Office Collection : सध्या 'टायगर 3'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने सगळ्यांनाचा हैराण केलं होतं. टाइगर 3 ने पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग केली होती. मात्र ओपनिंगनंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही. 'टायगर 3'च्या बॉक्स ऑफिसवरील घसरलेल्या कलेक्शनचं कारण वर्ल्डकप २०२३ असल्याचं म्हटलं होतं. रिपोर्टनुसार इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याच्या दिवशी टायगर ३ केवळ 10.25 करोडची कमाई करु शकला. खरंतर या सिनेमाने शनिवारी 18 करोडपेक्षा जास्त बिझनेस केला आहे.

एका रिपोर्टनुसार ;टायगर 3'ने रिलीजच्या आठव्या दिवशी आत्तापर्यंतची सगळ्यात कमी कलेक्शन केलं आहे.  तर दुसरीकडे 'टायगर 3'च्या पहिल्या दिवसापासून ते आठव्या दिवसापर्यंतच्या कलेक्शनवर नजर टाकली असता या सिनेमाने देशांतर्गत 44.5 करोड रुपयांसोबत बॉक्स ऑफिसवर ओपनिंग केली होती. सिनेमाच्या दूसऱ्या दिवशी 59.25 करोडचं  कलेक्शन केलं. 'टायगर 3'च्या कमाईच्या तिसऱ्या दिवसानंतर या सिनेमाची घसरण पहायला मिळाली.   अर्ली ट्रेंड्सच्या रिपोर्टनुसार, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर टायगर 3 चं एकूण कलेक्शन 229.65 कोटी रुपयं झालं आहे.तर रिपोर्टनुसार सलमान खान आणि कतरिना कैफचा सिनेमा 'टायगर 3'ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 357 करोडची कमाई केली आहे.   

२०१२ साली या फ्रेंचाइजीला सुरुवात झाली. या फ्रेंचायजीची सुरुवात 'एक था टायगर'पासून झाली. टायगर जिंदा है हा या सिनेमाचा तिसरा भाग होता. आणि आता काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेला टायगर ३ हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवत आहे. या सिनेमात सलमान कतरिनासोबतच  इमरान हाशमी लीड रोलमध्ये आहे. या सिनेमात इमरान आईएसआयचा एक्स एजंटटच्या भूमिकेत दिसत आहे. इमरानने निभावलेलं खलनायकाची भूमिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या भूमिकेचं सगळीकडून कौतुक होताना दिसत आहे.
 
या चित्रपटात एक भारतीय स्पाय कशा प्रकारे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जीव वाचवण्यासाठी खूप मेहनत करतो. त्यावेळी त्याच्या मदतीसाठी पठाण धावून येतो. हे सगळं पाहणं खूप मजेशीर आहे. 'टायगर 3' हा चित्रपट यशराज स्पाय यूनिव्हर्समधील 5 वा चित्रपट आहे. 'टायगर 3' या चित्रपटानंतर 'वॉर 2' आणि 'टायगर वर्सेस पठाण' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.