आमिरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' एकाच वेळी ७००० स्क्रीन्सवर प्रदर्शित

पहिल्या दोन दिवसांचे शो अगोदरच हाऊसफुल

Updated: Nov 8, 2018, 09:38 AM IST
आमिरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' एकाच वेळी ७००० स्क्रीन्सवर प्रदर्शित  title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला  'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा बिगबजेट चित्रपट आज प्रदर्शित झालाय. हा चित्रपट भारतात तब्बल ५००० पेक्षा जास्त आणि परदेशात २००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलाय. 

२१० कोटी बजेट असलेला हा चित्रपट यशराज फिल्मसनं थ्रीडी आणि आयमॅक्समध्येही प्रदर्शित केलाय. दोन सुपरस्टार पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे. 

त्यामुळेच या चित्रपटाचे पहिल्या दोन दिवसांचे शो हाऊसफुल झालेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट ३५ ते ४० कोटींचा व्यवसाय करेल असा अंदाज वर्तवला जातोय.

तर चार दिवसांचा मोठा वीकेंड असल्यामुळे हा चित्रपट वीकेंडपर्यंत २०० कोटी कमावण्याची शक्यता आहे.