मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्से सोशल मीडियावर शेअर करत असतात. शिवाय ते त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना स्वतःबद्दलची माहिती देत असतात. ते आपल्या कामाबाबत किती गंभीर आहे, हे कोणापासून लपून राहिलेलं नाही. कलाकार कोणत्याही परिस्थितीत आपलं काम सोडत नाहीत. एकदा दिवाळीत फटाक्यांनी त्यांचा हात जळला होता, पण तरीही त्यांनी आपल्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. अमिताभ यांनी ट्विटर आणि ब्लॉग या दोन्ही ठिकाणी याबद्दल सांगितलं होतं.
ट्विटरवर फोटो शेअर केला
आपल्या बोटाचा क्लोजअप फोटो शेअर करत अमिताभ यांनी ट्विटरवर लिहिलं की, 'बोटं हे मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग आहेत. ज्याची पुनर्रचना होण्यासाठी वेळ लागतो. सतत हालचाल आवश्यक आहे. हालचाली थांबल्या की बोटं सुन्न होतात...मला माहीत आहे...दिवाळीला फटाक्यांमुळे माझा हात जळला होता. करंगळीपासून माझ्या अंगठ्यापर्यंत पोहोचायला २ महिने लागले...आता बघा किती क्रिएटिव.'
असं अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे
यानंतर त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं की, 'काम चालूच राहिलं... हातावर रुमाल बांधला, ज्यामुळे ती स्टाईल वाटत होती... किंवा अॅटिट्यूड शो करण्यासाठी खिशात ठेवला... पण काम चालूच राहिलं असतं... जसं की, हे चाललंच पाहिजे. मात्र, अमिताभ यांनी चित्रपटांबद्दल फारसं काही लिहिलं नाही. इकलाब आणि शराबी या चित्रपटाचं वर्णन करताना त्यांनी लिहिलं, पहिला चित्रपट मद्रास प्रॉडक्शनचा होता आणि दुसरा 'शराबी'.
या चित्रपटांचे चित्रीकरण झाले
विशेष म्हणजे 1984 मध्ये प्रदर्शित झालेला 'इकलाब' हा चित्रपट राजकीय थ्रिलर होता. यामध्ये श्रीदेवी अमिताभ बच्चन यांच्या विरुद्ध भूमिकेत होती. या चित्रपटात निरुपा रॉय यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर 1984 मध्ये 'शराबी'हा रिलीज झाला होता. या चित्रपटात जयाप्रदा मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटात प्राण, ओम प्रकाश आणि रणजीत सारखे स्टार्स होते.
Fingers ... the most difficult element of the human body to restructure .. need movement continuously .. stop movement they become stiff .. I know .. blew my hand off with a Diwali bomb .. took me 2 months to move my thumb to my index finger !! .. & now how creative pic.twitter.com/qc6kKk3fRD
Amitabh Bachchan (@SrBachchan) May 13, 2020
त्याचवेळी, 'इकलाब' (1984) चित्रपटाच्या सीनमध्ये अमिताभ हातात रुमाल घेऊन नाचताना दिसले होते. त्याचबरोबर, 'शराबी' (1984) चित्रपटात ते पांढरा सूट परिधान केलेला, एका हातात ग्लोव्ह धरलेला आणि दुसऱ्या हाताने खिसा काढताना दिसला होता.