'कपिल शर्मा' विरुद्ध 'सनी लिऑनी', तुम्ही कोणाला बघणार ?

या आठवड्यात, १ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन खास बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2017, 07:38 PM IST
 'कपिल शर्मा' विरुद्ध 'सनी लिऑनी', तुम्ही कोणाला बघणार ? title=

मुंबई : या आठवड्यात, १ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन खास बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित आहेत. 

काय निवडाल ?

एकीकडे, प्रेक्षकांना स्क्रीनवर ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे हसून लोटपोट करणारी कॉमेडी असणार आहे. यापैकी तुम्ही कशाची निवड करणार ? हा प्रश्न आहे. 

'तेरा इंतजार'

या आठवड्यात सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या फिल्म 'तेरा इंतजार' रिलीज होणार आहे. हा चित्रपट राजीव वालियाने दिग्दर्शित केला आहे. ड्रामा बेस असणार्या या सिनेमात सनी लिऑनीही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 

'फिरंगी'

याशिवाय कपिल शर्माचा आगामी चित्रपट 'फिरंगी' ही याच आठवड्यात रिलीज होणार आहे. कपिल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या कथेनुसार, त्याला ब्रिटीश सरकारच्या नियमाखाली पोलिसांची नोकरी मिळते आणि त्याचे जीवन येथून एक नवे वळण घेते.

पद्मावती 

या आठवड्यात रणवीर आणि दिपिका दीपिका पदुकोण यांच्या 'पद्मावती' रिलीजची जाहीर केली होती, पण चित्रपटाला होत असलेला विरोध आणि सेंसॉरबोर्ड प्रमाणपत्र न मिळाल्याने सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे.