असा आहे 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डाएट प्लान

मिस वर्ल्ड २०१७ हा पुरस्कार जिंकून मानुषी छिल्लरनं भारताचं नाव जगात आणखी उज्ज्वल केलं.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 26, 2017, 07:03 PM IST
असा आहे 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डाएट प्लान  title=

मुंबई : मिस वर्ल्ड २०१७ हा पुरस्कार जिंकून मानुषी छिल्लरनं भारताचं नाव जगात आणखी उज्ज्वल केलं. १७ वर्षानंतर भारतीय महिलेला मिस वर्ल्ड हा किताब मिळाला. याआधी २००० साली प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली होती. मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर मानुषीबद्दलच्या गोष्टी जाणण्यात अनेकांना रस आहे. कित्येकांना तर मानुषीचा डाएट प्लान जाणण्याची उत्सुकता आहे.

मानुषीचा डाएट प्लान

मानुषी छिल्लरचा डाएट प्लान तिची न्यूट्रीशियन नमामी अग्रवालनं तयार केला आहे. फिट राहण्यासाठी मानुषी हा डाएट प्लान फॉलो करते. मानुषी रोजच्या खाण्यात हिरव्या भाज्या आणि फळं जास्त खाते.

Manushi Chhillar, Miss World 2017

याचबरोबर मानुषी व्यायामही करते. आठवड्यातून ४ ते ५ वेळा मानुषी व्यायाम करते.

Manushi Chhillar, Miss World 2017

मानुषी रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिते.

Manushi Chhillar, Miss World 2017

सकाळच्या नाष्ट्यामध्ये मानुषी योगर्टबरोबर ओट्स किंवा दलिया आणि ताजी फळं खाते. याचबरोबर २-३ अंड्यांचा पांढरा भाग, एवोकोडो, गाजर आणि बीट खाणंही मानुषी पसंत करते.

Manushi Chhillar, Miss World 2017

दुपारच्या जेवणात मानुषी एक-दोन पोळ्या किंवा एक बाऊल भात, भाजी, चिकन आणि सलाड खाते.

Manushi Chhillar, Miss World 2017

संध्याकाळी मानुषी फळांपासून बनवलेलं स्मूदी आणि काजू खाणं पसंत करते.

Manushi Chhillar, Miss World 2017

रात्रीचं जेवण मानुषी सूर्यास्ताआधीच करते. रात्रीच्या जेवणात मानुषी क्युनाओ सलाड किंवा पुलाव आणि चिकनं किंवा मासे आणि टोफू सलाड आणि सूप घेते.

Manushi Chhillar, Miss World 2017

फिट राहण्यासाठी मानुषी घरचंच जेवण जेवते. तसंच तिच्याबरोबर फळंही नेहमी असतात.

Manushi Chhillar, Miss World 2017

याचबरोबर मानुषी दिवसाला ४ ते ५ लीटर पाणी पिते. नारळ पाणीही मानुषीला आवडतं.