शाळेच्या ड्रेसमध्ये दिसणारी गोंडस मुलगी आज बनली आहे नॅशनल क्रश, तुम्ही ओळखलं का?

व्हायरल होणाऱ्या फोटोत अभिनेत्री  शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

Updated: Nov 14, 2021, 10:35 PM IST
शाळेच्या ड्रेसमध्ये दिसणारी गोंडस मुलगी आज बनली आहे नॅशनल क्रश, तुम्ही ओळखलं का?   title=

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक रश्मिका मंदान्ना तिच्या स्टायलिश लूक आणि अभिनयामुळे खूप चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी रश्मिकाने आपलं नाव टॉप अभिनेत्रींमध्ये सामील केलं आहे. आज अभिनेत्रीकडे चित्रपटांची लाईन आहे. पण ती विचारपूर्वक चित्रपट निवडते. रश्मिका मंदान्नाचा  बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोतील रश्मिकाला अनेकांना ओळखता येत नाही. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या सतत कमेंट्स येत आहेत.

हा फोटो रश्मिका मंदान्ना 4-5 वर्षांचा असेल तेव्हाचा. त्यावेळी तिला पाहून कोण म्हणू शकेल की, एक दिवस ती चित्रपटसृष्टीवर राज्य करेल. रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता पाहून तिला नॅशनल क्रश असंही म्हटलं जातं. रश्मिकाने तिच्या शॉर्ट फिल्म करिअरमध्ये एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'अलविदा' या बॉलिवूड चित्रपटात ती मेगास्टार अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत काम करणार असल्याचं वृत्त आहे.

रश्मिका मंदान्नाचा आगामी चित्रपट 'पुष्पा' आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन दिसणार आहे. रश्मिका तेलगू आणि कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिकाने 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याचवेळी, तिने 2018 मध्ये 'चलो' चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि हा चित्रपट देखील खूप सुपरहिट ठरला.  रश्मिका मंदान्ना 'गीत गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' सारख्या महान चित्रपटांपेक्षा जास्त ओळखली जाते. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार विजय देवरकोंडाही होता. रश्मिका मंदान्ना लवकरच 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.