अंगावर रणबीरच्या नावाचा टॅटू, रणवीरसोबत गळाभेट...

बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांची तिसरी एनिव्हर्सरी साजरी करत आहेत.

Updated: Nov 14, 2021, 10:12 PM IST
अंगावर रणबीरच्या नावाचा टॅटू, रणवीरसोबत गळाभेट... title=

मुंबई : बॉलिवूड चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांची तिसरी एनिव्हर्सरी साजरी करत आहेत. या स्टार कपलने 2018 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री दीपिका पदुकोण रणवीर सिंगला डेट करण्याआधी फिल्मस्टार रणबीर कपूरच्या प्रेमात होती. अभिनेत्रीने तिच्या मानेवर खास रणबीर कपूरचा टॅटूही बनवला आहे. रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या वेळी जेव्हा अभिनेत्री रणवीर सिंगला भेटली तेव्हा तिने त्याला मिठी मारली, यावेळी दीपिकाच्या मानेवर 'RK' टॅटू होता

दीपिका पदुकोणने रणबीर कपूरसाठी 'RK' टॅटू बनवला होता
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बचना ए हसीनो या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. रणबीर कपूरच्या प्रेमात ही अभिनेत्री वाईटरित्या अडकली होती. म्हणूनच या अभिनेत्रीने रणबीर कपूरच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'RK'नावाचा टॅटू काढला. ज्याची यावेळी खूप चर्चा झाली होती. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचं नाते फार काळ टिकलं नाही. अभिनेत्रीने रणबीरवर फसवणुकीचा आरोपही केला होता. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात रणवीर सिंगची एन्ट्री झाली.

'रामलीला'च्या सेटवर दीपिका पदुकोण-रणवीर सिंगची भेट झाली.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची यांची पहिली भेट 'रामलीला' चित्रपटा दरम्यन झाली. योवेळी रणवीर सिंगने अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेमात पडले.

दीपिका पदुकोणने उघडपणे रणवीर सिंगला मिठी मारली
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका पदुकोणने तिचा 'आरके' टॅटू काढला नाही. यादरम्यान जेव्हा अभिनेत्री रणवीर सिंगला मिठी मारताना दिसली तेव्हा तिचा टॅटू पुन्हा चर्चेत आला.

लोकांच्या नजरा 'आरके' टॅटूवर गेल्या
यादरम्यान रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण एकमेकांना मिठी मारतानाचे फोटो मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या आरके टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं. मात्र रणवीर सिंगसोबत लग्न करण्यापूर्वीच अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचा आरके टॅटू काढून टाकला.