कधी कुली तर कधी केलं सुतारचं काम, मित्राच्या सल्ल्यावरून 'हा' चिमुकला झाला अभिनेता; आज एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी

This Child is now charging 250-300 cr for a Movie : या चिमुकल्याला तुम्ही ओळखलंत का? आज एका-एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी

दिक्षा पाटील | Updated: Dec 12, 2024, 11:35 AM IST
कधी कुली तर कधी केलं सुतारचं काम, मित्राच्या सल्ल्यावरून 'हा' चिमुकला झाला अभिनेता; आज एका चित्रपटासाठी घेतो 250-300 कोटी title=
(Photo Credit : Social Media)

This Child is now charging 250-300 cr for a Movie : प्रत्येक व्यक्ती कधीना कधी स्ट्रगल करते. त्यानंतर एखाद्याचं नशिब इतकं चमकतं की ती व्यक्ती आयुष्यात कधी मागे वळून पाहत नाही. असंचं काही तरी या चिमुकल्यासोबत झालं. या चिमुकल्यानं तरुणपनात इतकं स्ट्रगल केलं की त्यानं कुली झाला, कधी कंडक्टर झाला आणि त्यानंतर एका मित्राच्या म्हणण्यानं तो एक अभिनेता झाला आणि त्यानं इतकी लोकप्रियता मिळाली की त्यानं सगळ्यांच्याच मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोण आहे ज्यानं इतकं सगळं केलं. चला तर आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया... 

या चिमुकल्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. कधी त्यांची फार बिकट परिस्थिती होती. तर त्यानं तीन-तीन प्रकारची कामं केली आणि आज हाच एक गाजलेला लोकप्रिय अभिनेता आहे. कधी या अभिनेत्यानं एका कुलीचं काम केलं जो रेल्वे स्टेशनवर लोकांचं सामान उचलायचा. या कामामुळे त्यांच्या मुलभूत गरजासुद्धा भागत नव्हत्या. त्यानंतर सुतारचं काम केलं. त्यानं देखील मुलभूत गरजांसाठी देखील पैसे मिळत नव्हते. संधी मिळाली आणि मग तो कंडक्टर झाला. त्यानंतर या चिमुकल्याचं नशिब चमकलं आणि तो तमिळ चित्रपटसृष्टीचा 'थलायवा' झाला. आता तुम्हाला अंदाज आला असेल की आपण कोणाविषयी बोलतोय. तर आज आपण रजनीकांत यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज रजनीकांत यांचा 74 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांचं खरं नाव खूप कमी लोकांना माहित असेल. रजनीकांत यांचा जन्म 1950 मध्ये महाराष्ट्रात झाला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही काही चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी कर्नाटकात कंडक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. तिकिट देताना त्यांची हटके स्टाईल पाहून त्यांच्या मित्रानं त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला आणि त्या सल्ल्यानंतर ते मद्रासला येऊन अभिनेता झाले. 

रजनीकांत यांचा पहिला चित्रपट हा 'अपूर्व रागंगल' होता. त्यांचा हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचवर्षी त्यांचा 'तूरुपु पडमारगा' हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित झाला. कोणत्याही इतर कलाकाराप्रमाणे रजनीकांत यांनी देखील अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, त्यांनी त्यांची वागणूक आणि स्टाइल त्यासोबत हटके डायलॉग डिलीव्हरीमुळे इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. 1978 मध्ये त्यांनी 20 पेक्षा जास्त भूमिकांमध्ये काम केलं. त्यावेळी 'भैरवी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि त्यांना सुपरस्टारचा खिताब मिळाला. 

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्याशिवाय 2016 मध्ये दिवंगत राष्ट्रपकी प्रणब मुखर्जी यांनी देखील त्यांचे पद्म विभूषण पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. 

हेही वाचा : 'अभिषेकचा तो शर्ट आजही...', 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये नाना पाटेकरांचा जुन्या आठवणींना उजाळा'

दरम्यान, सध्या रजनीकांत हे 'जय भीम' चे दिग्दर्शक ज्ञानवेल राजा यांच्यासोबत आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. त्याशिवाय लोकेश कनगराजसोबत ते चित्रपट करणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत श्रुती हासन आणि नागार्जुन देखील दिसणार आहेत. रजनीकांत हे याच चित्रपटासाठी 250-300 कोटी घेत असल्याचे म्हटले जात आहे.