Actress talked About Gender Discrimination : अभिनय क्षेत्र हे जितकं सुंदर दिसतं ते पाहून सगळ्यांना या क्षेत्राकडे येण्याची इच्छा होते. प्रत्येकला वाटतं की मी देखील इथे आल्यानंतर लग्झरी आयुष्य जगणार. पण चित्रपटात आल्यानंतर यशस्वी होणं काही सोपं नाही. चित्रपटसृष्टीत नेहमीच ऐकायला मिळतं की कोणी कास्टिंग काऊचचा शिकार होतात, तर कधी कोणी. अशात 90 च्या दशकातील फिल्म इंड्स्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री दीया मिर्जानं एका मुलाखतीत या मागचं सत्य सगळ्यांसमोर आणलं आहे. त्यासोबत तिनं इंडस्ट्रीतील एक सत्य समोर आलं आहे.
दीया मिर्जाचा आज 9 डिसेंबर 1981 हैदराबादमध्ये झाला होता. आज दीयाचा 43 वाढदिवस आहे. तिनं इंडस्ट्रीमध्ये एकामागे एक गाजलेले चित्रपट दिले. तिनं तिच्या या प्रवासाविषयी सांगितलं की बॉलिवूडमध्ये जेव्हा ती आली तेव्हा कलाकारांची संख्या जास्त होती. दीयानं सांगितलं की यामुळे भेदभाव होऊ लागले. त्याशिवाय कलाकारांची व्हॅनिटी व्हॅन देखील नसायची.
तेव्हाचे दिवस आठवत दीया मिर्झानं सांगितलं की अभिनेत्रीचे कपडे झाडाच्या किंवा खडकाच्या मागे बदलावे लागत होते. अनेक कलाकारांसाठी ज्युनियर आर्टिस्ट साडी आणि चादरनं गोल घेर करुन रहायचे. त्यानंतर ते लोक कपडे बदलायचे. इतकच नाही तर दीयानं हे देखील सांगितलं की अभिनेत्रींसाठी बाथरुम देखीस नसायची.
दीया मिर्झा बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की 'तेव्हा अभिनेत्रींसोबत भेदभाव व्हायचे. त्यांनी सांगितलं की जेव्हा चित्रपटसृष्टीत करियरची सुरुवात केली तर इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री खूप कमी असायच्या. त्यामुळे त्यांच्यासोबत प्रत्येकवेळी मतभेद व्हायचे. दीयानं पुढे सांगितलं की अभिनेत्यांच्या व्हॅनिटी व्हॅनच्या तुलनेत फीमेल कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅनची साइज ही छोटी असते. जर बाहेर शूटसाठी अभिनेत्री गेल्या तर ना त्यांना कपडे बदलण्यासाठी किंवा ना त्यांना बाथरुमला जाण्यासाठी काही सुविधा नसायची.'
हेही वाचा : अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अपनंतर पुन्हा प्रेमात पडली मलायका अरोरा! Photos Viral, कोण आहे तो?
दीया मिर्झानं हे देखील सांगितलं की 'जर ती किंवा इतर कोणती अभिनेत्री ही सेटवर उशिरा आली. तर तिला अनप्रोफेशन्ल हा टॅग देण्यात यायचा. पण जर असंच एखाद्या अभिनेत्यानं केलं तर त्याला या सगळ्या गोष्टी लागू होत नव्हत्या. त्याच्या उशिरा आल्यानं काही त्रास होत नाही.'