अरे बापरे... कोण आहे 'ही' अभिनेत्री? बॉलीवुडचा खिलाडीसोबत 'तो' सीन द्यायला तयार झाली...

अक्षय सोबत चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री काहीही करण्यास तयार होतात. असंच काही मधल्या काळात एक अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घडलं होतं.

Updated: Nov 15, 2022, 09:46 PM IST
अरे बापरे... कोण आहे 'ही' अभिनेत्री? बॉलीवुडचा खिलाडीसोबत 'तो' सीन द्यायला तयार झाली... title=
this actress ready to give a scene with a Bollywood actor akshay kumar raam setu nz

Akshay Kumar : बॉलीवुडचा खिलाडी अशी ओळख निर्माण करणारा एकमेव कलाकार अक्षय कुमार. त्यानं त्याच्या चित्रपटाने प्रेक्षकांंच्या मनात एक वेगळीच जागा तयार केली आहे. अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे जो एका वर्षात इतके चित्रपट करतो की लोकांना अंदाज लावणे कठीण होते. अक्षय कुमार त्याच्या बॅक टू बॅक सिनेमांमुळेच नेहमीच चर्चेत असतो. त्यासाठी तो भरमसाठ फी देखील घेतो. अक्षय कुमारला त्याच्या फिटनेससाठी देखील ओळखले जाते. (this actress ready to give a  scene with a Bollywood actor akshay kumar raam setu nz)

हे ही वाचा - बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सचे वीज बिल ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का...

अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर फ्लॉप

अक्षय कुमार हा इतर अभिनेत्यांच्या तुलनेत जास्तच चर्चेत असणारा कलाकार आहे. मात्र अलीकडच्या काळात त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. अक्षय कुमारसाठी 2022 हे वर्ष खूपच निराशाजनक ठरले आहे. त्यांचे 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षा बंधन' आणि 'राम सेतू' हे चारही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आणि हे चारही चित्रपट कोसळले. एकही चित्रपट 70 कोटींचा टप्पा गाठू शकला नाही.

हे ही वाचा - महाराष्ट्राची हास्यजत्रामधील 'या' अभिनेत्रीचा तो Video आला समोर... प्रेक्षक हैराण

अभिनेत्री काहीही करण्यास तयार

अक्षय कुमारचा बॉक्स ऑफिसवर सध्या दबदबा जरी नसला तरी अक्षय कुमार सोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री धडपडत आहेत. अक्षय सोबत चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभिनेत्री काहीही करण्यास तयार होतात. असंच काही मधल्या काळात एक अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घडलं होतं. वयाच्या 46 व्या वर्षी आपल्या फिटनेस आणि बोल्ड लूकने अनेकांना घायाळ करणारी चित्रांगदाने अक्षय सोबत काम करण्यासाठी चक्क आपले कपडे काढले होते.

चित्रगंधाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

हजारो ख्वाईश है ऐसी या चित्रपटांमधून चित्रगंधाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा अनेक हिट चित्रपटांमध्ये सहभाग होता. तिनं तिच्या अंदाजाने चाहता वर्ग तयार केला होता. गब्बर इज बॅक या चित्रपटातील ‘कुंडी मत खडकाओ राजा’ गाण्यातून तिने आपल्या कातिल अदा आणि हॉट लूकने अनेकांना अक्षरशः वेड लावलं. ती चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन करणे टाळते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि तिने इंटीमेट सीन करण्यास नकार दिला. पण तिने अक्षय कुमारसोबत इंटिमेट सीन केले नाहीत तर कपडे उतरवण्यासारखे सीन केले.

हे ही वाचा - धक्कादायक! या बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान अभिनेत्यांसोबत ठेवले होते शारीरिक संबंध... 

देसी बॉईज या चित्रपटात खिलाडीसोबत चित्रांगदा

देसी बॉईज या चित्रपटात खिलाडी कुमारसोबत चित्रांगदा दिसली होती. त्या चित्रपटात अक्षय कुमार विद्यार्थी असून चित्रांगदा ही त्याची प्रोफेसर असे दाखवण्यात आले होते. त्या ही व्यक्तीरेखी चांगलीच पार पाडली होती. त्या चित्रपटाच्या एका सीनमध्ये प्रोफेसर म्हणजेच चित्रांगदा त्याला आव्हान देते की ती अक्षय कुमारला एक एक करून प्रश्न विचारेल आणि जर त्याने बरोबर उत्तर दिल्यास ती स्वत:चे एक एक करुन कपडे काढेल. 

या दोघांचा हा रोमँटिक सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या सीनची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. त्याचबरोबर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रांगदा सिंग आणि अक्षय कुमारचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.