मुंबई : बॉलीवूडचं जग जेवढं बाहेरून ग्लॅमरस दिसतं तेवढंच आतून पोकळ आहे. असं म्हणतात. पडद्यावर दिसणारे हे सुपरहिट स्टार्स खऱ्या आयुष्यात अनेक गोष्टींचं व्यसन करतात. ज्यामध्ये नशेचाही समावेश आहे. या लखलखत्या दुनियेतील स्टार्स केव्हा नशेच्या आहारी जातात हे त्यांनादेखील समजत नाही आणि जेव्हा त्यांना समजतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच अनेक अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्यांच्या आयुष्यात दारू आणि सिगारेट महत्त्वाचा भाग आहे. तर अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी या सवयींचा कायमचा निरोप घेतला आहे.
करिना कपूर
या यादीत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान पहिल्या क्रमांकावर आहे. असं म्हटलं जातं की, करीना कपूर तिच्या पार्ट्यांमध्ये अनेकदा दारू आणि सिगारेटचं सेवन करते. करिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्येही अनेकवेळा दारूच्या बॉटल्सदेखील दिसतात.
अमिषा पटेल
अमिषा पटेलने बॉलिवूड इंडस्ट्रीत धमाकेदार एन्ट्री केली. कहो ना प्यार है हा चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर अमिषा पटेल रातोरात स्टार बनली. पण काही काळानंतर तिची फिल्मी कारकीर्द बुडाली. त्यानंतर अमिषा अधिकाधिक दारू आणि सिगारेटचे सेवन करू लागली. ती अनेकदा पार्ट्यांमध्ये नशेत दिसते.
कंगना रनौत
वादांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौतचं नावही 'या' यादीत आहे. कंगनाला सिगारेट आणि दारूचं व्यसन आहे. खुद्द कंगना राणौतनेही कबूल केलं आहे की, एकेकाळी ती दारू, ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकली होती. आजही कंगनाच्या फोटोंमध्ये तिच्या हातात वाईनचं ग्लास दिसतं.
रानी मुखर्जी
या यादीत बॉलिवूडची मर्दानी म्हणजेच अभिनेत्री राणीचंही नाव आहे. राणी मुखर्जीला सिगारेट ओढण्याची वाईट सवय असल्याचं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, ती सिगारेट ओढणं तिच्या पचनासाठी उपयुक्त मानते.
सुष्मिता सेन
अभिनेत्री सुष्मिता सेनबद्दल असं म्हटलं जातं की, तिला सिगारेट ओढण्याची खूप वाईट सवय आहे. चित्रपटाच्या सेटवरही ती अनेकदा सिगारेट ओढताना दिसली आहे.
ममता कुलकर्णी
करण अर्जुनच्या माध्यमातून लोकांच्या हृदयावर छाप सोडणारी सुंदर अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव निश्चितच वादात सापडलं आहे. बॉलिवूडच्या जगापासून दूर असलेल्या ममता कुलकर्णीला काही वर्षांपूर्वी ड्रग्जचं व्यसन लागलं होतं की, तिने सगळं काही सोडलं होतं.