The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून वादात असणारा चित्रपट 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) अखेर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून या चित्रपटाभोवती वादंग निर्माण झाला आहे. या चित्रपटाविषयी सर्वाच्च न्यायालयानं (Supreme Court) महत्त्वाची टिप्पणी दिली आहे. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करण्यात आले यावर हा चित्रपट बेतलेला आहे. या चित्रपटावरून बराच वादंग निर्माण झाला असून चित्रपटाला विरोध करण्याऱ्यांनी न्यायलयाची पयारी चढली आहे. त्यामुळे या चित्रपटाविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या वकिलांनी परत एकदा सर्वाच्च न्यायलयाची पायरी चढली आहे. त्यावर आता सुप्रिम कोर्टानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे.
यावेळी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (CJI Chandrachud) म्हणाले की, ''तुम्ही वारंवार चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करता आहात. परंतु निर्मात्यांसह चित्रपटाशी संबंधित अनेक लोकांनी या चित्रपटासाठी मेहनत घेतली आहे. त्यांच्या कष्टाकडे दुर्लेक्ष करून चालणार नाही. लोकांना ठरवू द्या की हा चित्रपट चांगला आहे की वाईट.'' त्यामुळे सीबीएफसीनं या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र दिल्यानं सीबीएफसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वाच्च न्यायलयानं नकार दिला असून कोर्टात मांडलेली ही याचिका काल फेटाळून लावण्यात आली आहे.
'दे करला स्टोरी' हा चित्रपट शुक्रवार, 5 मे रोजी प्रदर्शित होणार असल्यानं सर्वाच्च न्यायलयानं तातडीनं सुनावणी द्यावी अशी मागणी जमियत उलेमा - ए - हिंदच्या विकलांनी केली होती परंतु त्यावर सर्वाच्च न्यायलयानं मात्र त्यांची मागणी फेटाळली आहे. केरळ उच्च न्यायलयाकडून चित्रपटाच्या प्रकरणी तातडीनं सुनावणी करत नाही असा दावा जमियतच्या वकिलांनी केला असून कित्येक लोकांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केल्या होत्या तसेच सीबीएफसीनंही या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रमाणपत्र कसे दिले? असा प्रश्न एका याचिकाकर्त्यानं आपल्या याचिकेतून मांडला आहे.
हेही वाचा - The Kerala Story चा वाद काही संपेना, प्रदर्शनाआधीच चित्रपटातल्या 10 दृश्यांवर कात्री
#BREAKING Supreme Court refuses to entertain plea challenging CBFC certification granted to #TheKeralaStory. Bench led by CJI Chandrachud remarks- "Think about labour of actors...You must be very careful about staying films. The market will decide if it is not up to the mark." pic.twitter.com/YuEFdMSFEf
— Live Law (@LiveLawIndia) May 4, 2023
या चित्रपटातून 32 हजार मळ्याळी मुलींचं धर्मांतर करण्यात आल्याचा दावा केला आहे. ही घटना सत्य घटनेवर असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या चित्रपटाभोवती मोठा वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मळ्याळम् या भाषांमध्ये आज शुक्रवारी 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे.