The Kerala Story चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन अचानक रुग्णालयात दाखल, पाहा नेमकं काय घडलं

The Kerala Story director Sudipto Sen : 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे त्यांचा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 27, 2023, 02:05 PM IST
The Kerala Story चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन अचानक रुग्णालयात दाखल, पाहा नेमकं काय घडलं title=
(Photo Credit : Social Media)

The Kerala Story director Sudipto Sen : 'द केरला स्टोरी' दिग्दर्शक सुदीप्तो सेन सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगलीच कमाई केली आहे. 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. जगातून सुदीप्तो सेन यांच्या या चित्रपटाची स्तुती होत असताना त्यांच्या विषयी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. सुदीप्तो यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीप्तो सेन हे गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी सतत प्रवास करत होते. तर सततच्या प्रवासामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यासोबत सध्या चित्रपटाचे प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सुदीप्तो सेन यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पुढे 10 शहरांमध्ये जात ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचं प्रमोशन करणार असल्याचे ठरवले आहे. 

दरम्यान, एकीकडे 'द केरला स्टोरी' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत, जे 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या विरोधात आहेत. त्या सगळ्याचा दबाव हा दिग्दर्शकांवर असतो. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनचं अनेकांनी त्याचा विरोध केला होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये तर हा चित्रपट पाहण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा पाहता हा चित्रपट त्या राज्यातही प्रदर्शित करण्यात आला आहे. आता पर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 213.17 कोटींचा गल्ला केला आहे. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट 250 कोटींचा आकडा पार करणार अशी आशा निर्मात्यांना आहे. 

हेही वाचा : माझ्याशी लग्न करशील? 'तिने' विचारलेल्या प्रश्नावर Salman Khan म्हणाला, "20 वर्षांपूर्वी..."

सगळ्यात महत्तावची गोष्ट म्हणजे 'द केरला स्टोरी' हा चित्रपट 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना लव्ह जिहादमध्ये कसे फसवले जाते, त्यानंतर त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे समावेश केला जातो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

'द केरला स्टोरी' प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट 'द काश्मिर फाइल्स' प्रमाणे आपल्या देशाच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केल्या होत्या.