यूट्यूबवर १०० कोटींहून अधिक वेळा पाहिलं गेलं पहिलं भारतीय गाणं

यूट्यूबवर अशाप्रकारे कमाल करणारा पहिला भारतीय व्हिडिओ

Updated: Jan 6, 2020, 01:16 PM IST
यूट्यूबवर १०० कोटींहून अधिक वेळा पाहिलं गेलं पहिलं भारतीय गाणं  title=
फोटो सौजन्य : videograb

नवी दिल्ली : सध्या पंजाबी गाणं 'लौंग लाची'ने (Laung Laachi) यूट्यूबवर एक वेगळाच इतिहास रचला आहे. 'लौंग लाची' या गाण्याने यूट्यूबवर १ बिलियन म्हणजेच १०० कोटींहून अधिक व्ह्यूजचा आकडा पार केला आहे. यूट्यूबवर अशाप्रकारे कमाल करणारा हा पहिला भारतीय व्हिडिओ ठरला आहे. या गाण्याने जवळपास २२ महिन्यांत हा रेकॉर्ड केला आहे. हिंदी गाण्यांना मागे टाकत सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये या गाण्याचा समावेश झाला आहे. 

'लौंग लाची'नंतर, नेहा कक्कर आणि टोनी कक्करच्या 'मिले हो तुम हमको' या गाण्याला यूट्यूबवर ८६४ मिलियन वेळा पाहण्यात आलं आहे. 

'लौंग लाची' हे 'लौंग लाची' चित्रपटातील गाणं आहे. एमी विर्क (Ammy Virk), नीरु बाजवा (Neeru Bajwa), आणि अमरदीप सिंह  (Amardeep Singh) यांच्यावर गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हे सुपरहिट गाणं अमन जयने कंपोज केलं आहे. तर हरमनजीतने लिहिलं आहे. गुरमीत सिंहने गाण्याला संगीत दिलं आहे.

यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये लुई फोंसी आणि डॅडी यांकी यांच्या 'देस्पासीतो' (despacito) या गाण्यानेही बाजी मारली आहे. १२ जानेवारी २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत ६.५ बिलियन म्हणजेच जवळपास ६०० कोटींहून अधिक वेळा पाहण्यात आलं आहे.