'इंडियाज गॉट टॅलेंट' शोच्या सेटवर आग, बादशाहच्या निर्णयामुळे अनर्थ टळला

व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का...  

Updated: Jan 25, 2022, 09:24 AM IST
 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोच्या सेटवर आग, बादशाहच्या निर्णयामुळे अनर्थ टळला title=

मुंबई : इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये दरवर्षी अनेक प्रतिभावान लोक त्यांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी येतात. हा एक असा शो आहे, जिथे लोकांना गाण्यापासून नृत्यापर्यंत विविध प्रकारचे अभिनय दाखवण्याची संधी मिळते. स्टेजवर अनेकजण अशी कला सादर करतात, ते पाहून जज देखील घाबरतात. आता देखील असचं काही झालं आहे. टास्क करत असताना एक स्पर्धक आगीत अडकला.

आगीत अडकलेल्या स्पर्धकाचं नाव प्रीतम आहे. जेव्हा प्रीतम टास्क पूर्ण करण्यासाठी एका झोपडीत गेला. टास्क सुरू होताचे प्रीतमला हात बांधून झोपडी पेटवण्यात आली. 

मात्र आग लागल्यानंतर प्रीतम आपल्या बेड्या उघडण्यासाठी धडपडताना दिसला. यादरम्यान प्रीतमसोबत एक कॅमेरामनही आत होता, जो त्याचा हा स्टंट सतत टिपत होता. 

पण काही वेळाने कॅमेरा बंद झाला. तेव्हा बादशाह म्हणला 'मला कॅमेऱ्यात काही दिसत नाही...' तेव्हा तात्काळ टास्क थांबविण्यात आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होते. स्पर्धक जीव वाचवण्यासाठी सर्वांना हाक मारत होता. तेव्हा स्वतः बादशाह जजच्या खुर्चीतून उठला आणि त्याने टास्क थांबविण्यासाठी सांगितलं.