साऊथचा सुपरस्टार विजयची राजकारणात एन्ट्री, जाहीर केलं पार्टीचं नाव

Thalapathy Vijay In Politics: दाक्षिणात्य चित्रपटात आपला दबदबा निर्माण करणरा थलापती विजय लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2024, 05:29 PM IST
साऊथचा सुपरस्टार विजयची राजकारणात एन्ट्री, जाहीर केलं पार्टीचं नाव  title=

Thalapathy Vijay In Politics: साऊथचे सिनेमा आणि तिथल्या सुपरस्टार्सची देशभरात स्वत:ची ओळख आहे. दक्षिणेतले प्रेक्षक तिथल्या सिने स्टार्सना देवाप्रमाणे प्रेम करतात. त्यांच्या सिनेमांना भरभरुन दाद येणं असो किंवा पोस्टरवर दुग्धाभिषेक करणं, अशा कित्येक गोष्टी दाक्षिणात्या चाहते करताना आपण पाहिलं असेल. चाहत्यांच्या याच प्रेमाचा आदर करत थलापती विजयने आपल्या करिअरसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचे चाहते, को स्टार्सकडून स्वागत होत आहे. विजयने इतर कोणत्या पक्षात जाण्यापेक्षा स्वत:ची पार्टी स्थापन केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

दाक्षिणात्य चित्रपटात आपला दबदबा निर्माण करणरा थलापती विजय लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. त्याने आपल्या पार्टीचे नाव देखील जाहीर केले आहे. तमिलागा वेत्री कडगम असे त्याच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव आहे. एक निवेदन जाहीर करत  त्याने याबद्दल माहिती दिली. 2024 मध्ये आपण कोणती निवडणूक लढवणार नाही. तसेच कोणच्या राजकीय पक्षाला समर्थनही देणार नाही. सामान्य आणि कार्यकारी परिषदेसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे विजय याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

आपली पार्टी तमिलागा वेत्री कडगमची नोंदणी करण्यासाठी विजयने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. आगामी 2026 ची विधानसभा निवडणूक लढणे आणि जिंकणे हे आमचे लक्ष्य असल्याचे विजयने सांगितले. लोकांना हवा असलेला बदल आपल्याला करायचाय, असे तो सांगतो. 

मराठी चित्रपटातील सर्वात मोठा स्टार, अशोक सराफांची संपत्ती किती?

दक्षिणेत विजयची वेगळी ओळख आहे. रजनीकांत यांच्यानंतर विजयच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. विजयने आपल्या सिनेमाची घोषणा केल्यानंतर चाहते रिलीजची वाट पाहत असतात. अनेक वर्षांपासून विजय आपल्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. अभिनयातील करिअर सर्वोच्च स्थानी असताना तो राजकारणातून जनतेसमोर येत आहे.

100 कोटीहून अधिक चार्ज घेणाऱ्या सुपरस्टार्सचा पहिला पगार किती होता?