सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Sonalee Kulkarni in South Movie : सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण, सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन

दिक्षा पाटील | Updated: Feb 2, 2024, 02:22 PM IST
सोनाली कुलकर्णीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण! सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत शेअर करणार स्क्रिन title=
(Photo Credit : PR Handover)

Sonalee Kulkarni in South Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यासाठी सोनाली कुलकर्णी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. 

ही एक लावणी असून ही फ्युजन लावणी असणार आहे. यात सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळणार आहे. आपल्या मनमोहक नृत्य अदाकारीनं सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार हे नक्कीच. आता महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य सोनाली दाक्षिणात्य चित्रपटात दाखवणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती दक्षिणात्य चित्रपट गाजवणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटाबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, ''हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली ही गोष्टी माझ्यासाठी खूप आनंदाची आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तर हा 25 जानेवारी रोजी इतर भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आता येणाऱ्या आठवड्यात हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.''

हेही वाचा : 'चोली टाइट बांध लें ताकि... '; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल

सोनालीनं या चित्रपटातील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तर तिच्या पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या गाण्याचं बॅकग्राऊंड म्युजिक हे मराठी किंवा लावणीचं असल्याचं वाटतंय, असं अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सोनालीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. काही तासात या गाण्याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे.