VIDEO : रणबीर, लग्न आणि 'त्या' दोघी

या दोघीही एकमेकींकडे बोटं दाखवत आहेत

Updated: Oct 13, 2018, 01:21 PM IST
VIDEO : रणबीर, लग्न आणि 'त्या' दोघी  title=

मुंबई: 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वाचा प्रोमो, ज्यामध्ये सेलिब्रिटींच्या गप्पांची झलक पाहण्यास मिळत आहे, तो अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी कलाविश्वात असणारे चर्चेचे विषय आणि एकंदरच सेलिब्रिटींमध्ये असणारी मैत्री, त्यांची बदलणारी नाती, या साऱ्याची झलक या प्रोमोतून पाहता येत आहे. 

करणसोबत कॉफी पित गप्पा मारण्यासाठी यावेळी  बऱ्याच अनपेक्षित जोड्या येणार असल्याची कल्पना याआधीच प्रेक्षकांना आली आहे. अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट. 

खुद्द करणही या पर्वाची सुरुवात स्त्रीशक्तीने करण्यासाठी उत्सुक असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 

या प्रोममध्ये आलिया आणि दीपिका अगदी खुलेपणाने रणबीरसोबतच्या त्यांच्या नात्याविषयी आणि लग्नाच्या बेताविषयी अगदी खुलेपणाने बोलत आहेत. 

रणबीरशी या दोन्ही अभिनेत्रींचं असणारं नातं काही वेगळं सांगण्याची गरज नाही. दीपिका पदुकोण हिच्यासोबत फार सुरुवातीला रणबीर रिलेशनशिपमध्ये होता. तर, सध्याच्या घडीला तो अभिनेत्री आलिया भट्ट हिला डेट करत आहे. 

एका अर्थी या दोघींमध्ये रणबीर हा एक समान दुवा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

दोघींपैकी सर्वात आधी लग्न कोण करणार? असा प्रश्न विचारला असता, दीपिका आणि आलिया या दोघीही एकमेकींकडे बोटं दाखवत आहेत. ही परिस्थिती पाहून दोघींवना हसूही आवरत नाहीये. 

ही तर फक्त सुरुवातच आहे, पुढे जाऊन आता या दोघींनी नेमकं कोणत्या विषयांवर गप्पा मारल्या आहेत, रणबीर आणि लग्नाविषयी त्यांची काय मतं आहेत, हे कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा भाग प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.