हिमानी शिवपुरी यांचा आलोकनाथवर गंभीर आरोप

एकदा तर फ्लाइटमध्येच....  आणखी एका अभिनेत्रीचा आरोप 

हिमानी शिवपुरी यांचा आलोकनाथवर गंभीर आरोप  title=

मुंबई : बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणजे लोकप्रिय अभिनेता आलोकनाथ यांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका पाठोपाठ एक महिला कलाकार त्यांच्यावर आरोप करत आहेत. सगळ्यात अगोदर प्रोड्यूसर विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर रेपचा आरोप लावला आहे. त्यानंतर संध्या मृदुल आणि हम साथ साथ है सिनेमातील क्रू मेंबरमधील लोकांनी आलोकनाथ यांच्यावर आरोप केला आहे. आता आलोकनाथ यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री हिमानी शिवपुरीने केलेले आरोप हे अतिशय धक्कादायक आहे. 

हिमानी शिवपुरी सिनेसृष्टीत गेली 34 वर्षे काम करत आहे. त्यांनी अनेक सिनेमांत आलोकनाथसोबत काम केलं आहे. हम साथ साथ है आणि परदेस हे दोन सिनेमे अधिक चर्चेत आले. आलोकनथ यांच्यावर असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपावर आता अभिनेत्री हिमानी यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे. हे आरोप ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 

हिमानी शिवपुरी म्हणाल्या की, जर असं केलं असेल तर खूप चुकीचं आहे. आपल्या ताकदीचा वापर करता कुणा महिलेवर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. अभिनेत्रींसोबत आलोकनाथ यांचा व्यवहार चांगला असायचा पण अनेकदा त्यांच्याबाबतच्या वेगळ्या गोष्टी कानावर पडायच्या. दिवसभर शुटिंग असताना आलोकनाथ यांच्या महिलांसोबत व्यवहार हा अतिशय विनम्र आणि सामान्य असे. दारू प्यायल्यानंतर मात्र ते वेगळे वागायचे. जणू आलोकनाथ दुहेरी आयुष्य जगत आहेत. 

दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात बदल व्हायचा. अनेक अभिनेत्रींकडून ऐकलं होतं की, आलोकनाथसोबत काम करताना त्रास होतो. त्यावेळी लोकं या गोष्टींवर जास्त बोलू इच्छित नसतं. आलोकनाथ यांची संस्कारी बाजू तर मीडियाने बनवली आहे. अशापद्धतीच्या वागणुकीमुळे अनेकदा त्यांची टेर देखील खेचली आहे. आयटीए अवॉर्ड दरम्यान त्यांनी एकदा दुबईत दारू प्यायले होते.  त्यावेळी त्यांची पत्नी या वागणुकीमुळे खूप कष्टी होती. अनेकदा तर उघड्यावर लघवी करताना देखील पकडलं होतं. तर एकदा चुकीच्या वर्तणुकीमुळे फ्लाइटमधून बाहेर काढलं होतं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x