अभिनेत्री Aamna Sharif नं मल्टिकलर समरसूटमध्ये वाढवलं इंटरनेटवरचं तापमान; photo झाले व्हायरल

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफने तिच्या नव्या बोल्ड फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

Updated: Sep 10, 2022, 09:05 PM IST
 अभिनेत्री Aamna Sharif नं मल्टिकलर समरसूटमध्ये वाढवलं इंटरनेटवरचं तापमान; photo झाले व्हायरल title=

Aamana Sharif Photos: टेलिव्हिजनच्या नायिकांमध्येही आता चांगलाच बोल्डनेस आला आहे. त्या त्यांचे बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटोज इन्टाग्रामवर पोस्ट करत असतात. त्यापैंकीच एक आहे आमना शरीफ (Aamana Sharif) ही अभिनेत्री. (television actress amnna sharif shares multicolor summer suit photos)

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफने तिच्या नव्या बोल्ड फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षीही ही अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. फ्लोरल ब्रॅलेटमध्ये बीचवर आमना शरीफचा बोल्ड लूक व्हायरल झाला असून तिच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री आमना शरीफ तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टायलिश स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आमना शरीफ मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. यावेळीही तिचे मालदीवचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

फ्लोरल ब्रॅलेटमध्ये आमना शरीफ खूपच हॉट दिसते आहे. मोकळे केस, डोळ्यात सनग्लासेस घालून डोक्यावर साफा बांधून आमनानं आपला लुक पुर्ण केला आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्री आमना शरीफने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'डे ड्रिमर.' आमना शरीफचे फोटो पाहून कमेंट करताना एका यूजरने लिहिले - बेबी ऑन फायर, तर दुसऱ्या यूजरने लिहिले - 'खूप सुंदर.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमना शरीफ ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. इंस्टाग्रामवर तिला 2.5 दशलक्ष युजर्स फॉलो करतात.