Award घेताना रणवीर सिंगच्या डोळ्यात अश्रु, Deepika च्या बहीणीने मात्र खेचली टेर?

महिन्याभरापुर्वी रणवीरचं न्यूड फोटोशूट व्हायरल झाले होते. 

Updated: Sep 10, 2022, 07:42 PM IST
Award घेताना रणवीर सिंगच्या डोळ्यात अश्रु, Deepika च्या बहीणीने मात्र खेचली टेर? title=

Ranveer Singh Award: नुकताच रणवीर सिंगला (Ranveer Singh) त्याच्या 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या रणवीर आपल्या या यशाचा आनंदोत्सव साजरा करताना दिसतो आहे. आपल्या या यशाचे सगळे श्रेय रणवीरनं आपल्या पत्नीला म्हणजेच दीपिका पादूकोनला दिलं. (actor ranveer singhs sister in law makes fun of him on instagram comment while he receives best actor award for 83 movie)

महिन्याभरापुर्वी रणवीरचं न्यूड फोटोशूट व्हायरल झाले होते. या एका फोटोशूटमुळे सगळीकडेच दहशत निर्माण झाली होती. मात्र फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या मंचावर पुरस्कार घेताना रणवीर सिंग खूपच भावूक दिसत होता. यावेळी केवळ रणवीरच नाही तर त्याची पत्नी दीपिका पदुकोणही खूप भावूक दिसली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच चांगला व्हायरल होतो आहे. 

हा व्हिडीओ रणवीरनंही त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. परंतु या व्हिडीओ खाली दीपिकाची बहीण म्हणजेच रणवीरच्या मेहूणीनं मात्र आपल्या कमेंटमधून त्याची मस्करी केली आहे. 

रणवीरच्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करताना अनिशा पदुकोणने लिहिले की, "हू इज कटिंग देम डॅम ऑनियन्स?" (Who is Cutting Them Damn Onions) या कमेंटमध्ये अनिशाने हार्ट इमोजी पोस्ट करताना ''लव्ह यू'' (Love You) असे लिहिले आहे. रणवीरच्या या व्हिडिओसोबतच चाहत्यांना अनिशाच्या या कमेंटलाही पसंती मिळत आहे.

हा पुरस्कार घेताना रणवीर सिंगने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील आणि बहिणीला दिले आणि ते आपल्यासाठी देव असल्याचे सांगितले. रणवीर पुढे म्हणाला की, त्याचे कुटुंबच त्याच्यासाठी सर्वस्व आहे, तो जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठी करतो. त्यांनी पत्नी दीपिका पदुकोणलाही हात धरून मंचावर आणले. रणवीरने दीपिकाला घरची लक्ष्मी म्हटले. पतीला भावूक होताना पाहून दीपिकाही खूप भावूक दिसत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणवीर सिंगला 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार घेताना रणवीरने असेही म्हटले होते की, माझ्या आयुष्यात काहीही घडते. तो माझ्या कल्पनेच्या पलीकडचा आहे, कधी कधी माझा विश्वासही बसत नाही की मी इथे आहे, हे करत आहे, तुम्हा सर्वांसमोर उभा आहे. मी अभिनेता झालो यावर माझा विश्वासच बसत नाही. हा एक चमत्कार आहे."