VIDEO : तेजस्वी प्रकाश हिचा बॅकलेस बोल्ड लूक व्हारयल

Tejasswi Prakash : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आपल्या बॉयफ्रेंडसोबत वाढदिवस साजरा करताना दिसून आली. यावेळी तिचा रेड ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिचा सुपर बॅकलेस रेड हॉट ड्रेस चर्चेचा विषय होता. 

Updated: Jun 10, 2023, 11:57 AM IST
VIDEO : तेजस्वी प्रकाश हिचा बॅकलेस बोल्ड लूक व्हारयल title=
Tejasswi Prakash goes bold in backless red dress ( Photo courtesy - viralbhayani )

Tejasswi Prakash Backless Red Dress : 'नागिन फेम' अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या वाढदिवशी अतिशय हॉट लाल ड्रेस परिधान केला होता. तेजस्वी प्रकाश हिने  बॅकलेस ड्रेस घालून पार्टीला हजेरी लावली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वीने यांनी  एकत्रित तेजस्वीनीचा वाढदिवस मीडिया आणि कॅमेरापर्ससोबत साजरा केला. त्यांनी चाहते आणि पापाराझींच्या उपस्थितीत एक छोटासा केक कापण्याचा सोहळा आयोजित केला होता.  

तेजस्वी प्रकाश हिने तिचा वाढदिवस तिच्या लोकप्रिय टीव्ही शो नागिन 6 च्या सेटवर साजरा केला. नंतर रात्री,वाढदिवसापूर्वी एक छोटीशी पार्टी केली. यावेळी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा यानेही तेथे हजेरी लावली होती. तेजस्वी प्रकाश ही एकदम ओपन असणाऱ्या बॅकलेस लाल ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तेजस्वी प्रकाश ही या बोल्ड ड्रेसमध्ये उठून दिसत होती. तिने तिचे केस बनमध्ये स्टाईल केले होते. मेकअपही छान हलकासा केला होता. दुसरीकडे, करण तेजस्वीच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्या आई-वडिलांसोबत दिसला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, करण हा तेजस्वीच्या आईचा हात धरताना दिसत आहे. त्यानंतर तो आपल्या पालकांसह रेस्टॉरंटमध्ये गेला होता.  

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. ही जोडी सध्या सिनेमा इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. ही जोडी बिग बॉस 15 मधील दोन प्रबळ स्पर्धक होती, शेवटी तेजस्वीने स्पर्धा जिंकली आणि करण दुसरा उपविजेता ठरला. शो दरम्यानचे त्यांचे प्रेम फुलल्याचे सांगितले जात आहे.