बर्थडेच्या दिवशी तेजश्री प्रधानचा चाहत्यांसाठी खास मेसेज

प्रत्येक कलाकारासाठी चांगले दिसण्यासोबतच फिटनेसही महत्त्वाचा असतो. फिट राहण्यासाठी ते सर्वतोपरी काळजी घेत असतात. 

Updated: Jun 6, 2018, 08:11 PM IST
बर्थडेच्या दिवशी तेजश्री प्रधानचा चाहत्यांसाठी खास मेसेज title=

मुंबई : प्रत्येक कलाकारासाठी चांगले दिसण्यासोबतच फिटनेसही महत्त्वाचा असतो. फिट राहण्यासाठी ते सर्वतोपरी काळजी घेत असतात. योग्य डाएट, पुरेसा व्यायाम आणि पुरेशी विश्रांती हे अनेक कलाकारांचे जीवनाचे सूत्र असते. फिट राहण्यासाठी व्यायाम हा आवश्यकच असतो. मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही आपल्या चाहत्यांसाठी फिटनेसबाबतचा एक व्हिडीओ शेअर केलाय.

बर्थडेच्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी खास मेसेज दिलाय. इतरांसारखं तेजश्रीने पार्टी करुन बर्थडेचं सेलिब्रेशन केलं नाही. तर फिटनेसचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. यात तेजश्री व्यायाम करताना दिसतेय. “Grow Younger on birthday.” असं तिने पोस्टमध्ये म्हटलंय.

या व्हिडीओत तेजश्रीला फिटनेस ट्रेनरसोबत व्यायाम करताना दिसतोय.  जॉगिंग, स्क्वॉट्स, जंपिंग जॅक्स करताना व्हिडीओत दिसतेय. तेजश्रीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनाही फिटनेसचे महत्त्व पटेल आणि तेही व्यायामाला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. 

 

#LETSGROWYOUNGER #HappyLife @sanjit.chandorkar

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on