Pushpa 2 : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कोटींची कमाई करून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सोशल मीडियावर देखील 'पुष्पा 2' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अशातच आता 'पुष्पा 2' चित्रपटात खलनायक तारक पोनप्पा याची जास्त चर्चा रंगली आहे.
'पुष्पा 2' चित्रपटाच्या मध्यभागी तारक पोनप्पा दिसत आहे. ज्याला चाहत्यांनी क्रिकेटर कृणाल पांड्या समजले. चित्रपटात खलनायकाचा हा लूक पाहून चाहत्यांचा देखील गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला कृणाल पांड्या समजले पण त्याचे नाव तारक पोनप्पा आहे.
खरचं 'पुष्पा 2' कृणाल पांड्या?
सध्या सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटातील एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तारक पोनप्पाचा लूक हा कृणाल पांड्या सारखा वाटत आहे. चित्रपटाच्या मध्यभागानंतर तारक पोनप्पा दिसतो. त्याला पाहून सध्या सर्वजण 'पुष्पा 2' चित्रपटात कृणाल पांड्याने अभिनय केला असल्याचं म्हणत आहेत. सध्या कृणाल पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जात आहे. या चित्रपटात कृणाल पांड्याने काम केल्याचं सांगितले जातेय. परंतु, असे अजिबात नाही. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटात कृणालने कोणतीही भूमिका साकारलेली नाहीये.
What a role by Krunal Pandya in Pushpa 2
pic.twitter.com/7sYm49TTlQ— ʀɪᴛɪᴋᴀʀᴏ_45 (@Ro_Hrishu_45) December 5, 2024
तारक पोनप्पाचा लूक कृणाल पांड्या सारखा दिसत असल्यामुळे प्रेक्षक गोंधळून गेले. कारण, दोघांचा ही लूक एकमेकांशी जुळत आहे. त्यामुळे 'पुष्पा 2' चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाची फसवणूक होऊ शकते. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या मीम्सवर अद्याप कृणाल पांड्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
कोण आहे तारक पोनप्पा?
'पुष्पा 2' चित्रपटात तारक पोनप्पाने कोगतम बुग्गा रेड्डीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याचा एक खास लूक आहे. ज्यामध्ये त्याने बांगड्या, नाकात नथ, हार आणि कानातले घातलेले आहेत. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आकर्षित करणारा आहे. त्याचा हा लूक क्रिकेटर कृणाल पांड्याशी जुळतो आहे.
त्यामुळे या चित्रपटात कृणाल पांड्याने अभिनय केल्याचं लोकांनी म्हटलं आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाआधी तारक पोनप्पाने 'देवरा -1', 'ज्युनियर एनटीआर' आणि सुपरस्टार यशच्या 'KGF 2' मध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत.